, Amravati DCC Bank Saam Tv
ऍग्रो वन

Amravati DCC Bank : अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय, पीककर्ज घेतलेल्या 50 हजार लाेकांना हाेणार फायदा

Siddharth Latkar

- अमर घटारे

Amravati :

येत्या 31 मार्चपर्यंत पीक कर्ज भरणा-या शेतक-यांना शून्य टक्के व्याज दाराने पीक कर्ज परत करता येईल अशी घाेषणा अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष बच्चू कडू (mla bacchu kadu) यांनी केली आहे. अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेने (Amravati DCC Bank) घेतलेला हा निर्णय राज्यातील पहिला निर्णय असल्याचा दावा कडू यांनी साम टीव्हीशी बाेलताना केला. (Maharashtra News)

आमदार बच्चू कडू म्हणाले दरवर्षी राज्य सरकार पीक कर्जावरील व्याजाची 6 टक्के रक्कम बँकेत जमा करत होती. यावर्षी ती व्याजाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. शेतकऱ्यांना ती रक्कम बँकेत व्याजासकट भरावी लागत होती.

आता अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे येत्या 31 मार्चपर्यंत कर्ज भरणाऱ्या शेतकऱयांना शून्य टक्के व्याज दाराने पीक कर्ज परत करता येणार आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ज्यावेळी सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा करेल तेव्हा शेतकऱ्याने ती रक्कम बँकेत जमा करावी किंवा नवीन पिककर्ज घेताना ती रक्कम भरावी हा ऐतिहासिक निर्णय अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने घेतल्याचे कडू यांनी नमूद केले. हा ऐतिहासिक निर्णय राज्यातील पहिला असल्याचा दावा आमदार कडू यांनी केला आहे. याचा फायदा अमरावती जिल्ह्यातील 50 हजार शेतकऱ्यांना होणार असल्याचे सांगण्यात आले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: संजय राऊतांनी सांभाळून बोलावं : बच्चू कडू

Explainer : लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाचवेळी निवडणुका शक्य आहेत का? 'वन नेशन, वन इलेक्शन'चा फायदा नक्की कोणाला? वाचा सविस्तर

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

Maharashtra Politics : अजित पवारांची सावध भूमिका, १० टक्के मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवणार?

Dharangaon News : पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली पण बाहेर आलाच नाही; तरुणाचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT