Dharashiv Krushi Utpanna Bazar Samiti : धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्ताधारी विराेधकांत जुंपली; काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठाेकलं टाळं

Dharashiv News : काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी बाजार समितीला टाळे ठोकत तेथेच ठिय्या आंदोलनास प्रारंभ केला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
congress karyakarta andolan in dharashiv krushi utpanna bazar samiti
congress karyakarta andolan in dharashiv krushi utpanna bazar samitisaam tv
Published On

- बालाजी सुरवसे

Dharashiv :

धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीत सुविधांचा अभाव असल्याचा आराेप करत विराेधकांनी (काॅंग्रेस) आज (गुरुवार) बाजार समितीला टाळं ठाेकले. या प्रकारामुळे धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीत (dharashiv krushi utpanna bazar samiti) सत्ताधारी आणि विरोधकांत वादावादी झाली. परिणामी परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्ताधारी आणि विरोधकांत राडा झाल्याचे आज पाहायला मिळाले. या बाजार समितीतील भौतिक सुविधांच्या अभावामुळे काँग्रेस पक्षाकडून बाजार समितीस टाळे ठोकून आंदोलनाचा इशारा देण्यात आला हाेता.

congress karyakarta andolan in dharashiv krushi utpanna bazar samiti
Satara Blast News : सातारा शहरानजीक शासकीय कार्यालयात स्फाेट, परिसर हादरला; अधिका-यांचे ताेंडावर बाेट

काँग्रेस कार्यकर्ते कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात टाळे ठोकत असतानाच बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील आणि काँग्रेस कार्यकर्त्यांत जोरदार हमरी तुमरी झाली. (Maharashtra News)

त्यानंतर काॅंग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी बाजार समितीला टाळे ठोकत तेथेच ठिय्या आंदोलनास प्रारंभ केला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे बाजार समिती परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

Edited By : Siddharth Latkar

congress karyakarta andolan in dharashiv krushi utpanna bazar samiti
Nashik City Bus Service : सिटी लिंक बस सेवा ठप्प, कर्मचा-यांनी पगार थकल्याने पुकारला संप

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com