Akola News Saam tv
ऍग्रो वन

Akola News : कापूस बियाणे खरेदीसाठी पहाटेपासून शेतकरी रांगेत; पॅकेट कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष

Akola News : अकोल्यात गेल्या काही दिवसांपासून ४५ अंशावर तपमानाचा पारा गेला आहे. त्यामुळे अकोल्याचे जिल्हाधिकारी यांनी अकोला जिल्ह्यात कलम १४४ लागू केली आहे

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 

अकोला : खरीप हंगाम तोंडावर असल्याने बियाणे खरेदीची लगबग सुरु झाली आहे. यामुळे कृषी केंद्रांवर गर्दी होत आहे. दरम्यान लवकर नंबर लागावा यासाठी शेतकरी पहाटेपासूनच कृषी केंद्राच्या बाहेर रांगेत उभे राहत आहेत. भर ऊन्हात अकोल्यात कापसाचे बियाणे घेण्यासाठी कृषी केंद्रावर शेतकऱ्यांच्या मोठ्या रांगा लागल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

अकोल्यात (Akola) गेल्या काही दिवसांपासून ४५ अंशावर तपमानाचा पारा गेला आहे. त्यामुळे अकोल्याचे जिल्हाधिकारी यांनी अकोला जिल्ह्यात कलम १४४ लागू केली आहे. तर दुसरीकडे उन्हात शेतकरी बियाणे घेण्यासाठी रांगेत उभा राहत असल्याचे देखील पाहण्यास मिळत आहे. दुपारचे साडेबारा वाजलेत तरी शेतकऱ्यांची बियाणे घेण्यासाठी धावपळ सुरू आहे. भर ऊन्हात अकोल्यात कापसाचे बियाणे घेण्यासाठी कृषी केंद्रावर शेतकऱ्यांच्या (Farmer) मोठ्या रांगा लागल्यात.

अजित १५५ बियाणासाठी गर्दी  

कापसाचे (Cotton) अजित १५५ बियाण्यासाठी जिल्ह्याभरातील कृषी केंद्रांवर शेतकर्यांच्या पहाटे सकाळपासून शेतकरी रांगेत उभे आहे. ऊन आणि पाण्याविना शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. युवा शेतकऱ्यांसह ज्येष्ठ शेतकरी वर्ग देखील रांगेमध्ये उभे आहे. थकवा जाणवल्याने काही शेतकरी रांगेत खाली बसले आहे. उन्हापासून बचाव म्हणून शेतकऱ्यांसाठी कुठल्याही प्रकारचा मंडप उभारला गेला नाही. पहाटे ६ वाजल्यापासून बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना रांगेत उभे राहावे लागत, मात्र नंबर लागल्यानंतर शेतकऱ्यांच्या हाती केवळ २ किंवा ३ पॅकेटच बियाण्याचे मिळते आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पीएम किसान योजनेसाठी फार्मर आयडी अनिवार्य; अन्यथा मिळणार नाही ₹२०००

Maharashtra Live News Update : पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का, दोन माजी नगरसेवकांचा ही जय महाराष्ट्र

Foreign Trip : नवीन वर्षात कमी बजेटमध्ये करा परदेश वारी, सध्या ट्रेंडिंगवर असलेले 'हे' ठिकाण ठरेल बेस्ट

Jay Dudhane : 'बिग बॉस' फेम अभिनेत्याच्या घरी लगीनघाई; गर्लफ्रेंडसोबत पार पडला साखरपुडा, क्यूट VIDEO होतोय व्हायरल

BMC Election: मुंबई महापालिकेत काँग्रेस एकटी? वंचित बिघडवणार काँग्रेसचं गणित?

SCROLL FOR NEXT