Crop Insurance company Saam tv
ऍग्रो वन

Crop Insurance company : अकोल्यात अखेर विमा कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

Akola News : बाळापूरचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी बाळापूरचे तहसीलदार आणि तालूका कृषी अधिकाऱ्यांना बाळापूर नगरपालिकेच्या मुख्य सभागृहात तब्बल दहा तास कोंडून ठेवले होते

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 

अकोला : पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची दावा यादी, सर्वेक्षण झालेली यादी तसेच पात्र आणि अपात्र याची कारणासह यादी, खरीप आणि रब्बी हंगामातील नुकसानीचे पंचनामे प्रती इतर दस्ताऐवज सादर केले नाहीत. यामूळे बाळापूर तालुक्यातील ७ हजार ५५६ शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा योग्य परतावा मिळाला नसल्याने नुकसान झाले आहे. जिल्हा कृषी अधिक्षक शंकर किरवे यांच्या तक्रारीवरून बाळापूर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीक विम्याचा परतावा (Farmer) शेतकऱ्यांना मिळाला नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. यावर आक्रमक भूमिका घेत बाळापूरचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी बाळापूरचे तहसीलदार आणि तालूका कृषी अधिकाऱ्यांना बाळापूर नगरपालिकेच्या मुख्य सभागृहात तब्बल दहा तास कोंडून ठेवले होते. विमा कंपन्यांच्या (Crop Insurance company) तक्रारीविरोधात नगरपालिकेत आमदार देशमुखांनी बैठक देखील बोलावली होती. मात्र सदर बैठकीला विमा कंपन्यांचे अधिकारी गैरहजर असल्याने आमदार देशमुख संतप्त झाले होते. तर विमा कंपन्यांनी परतावा न देतांना राज्यात हजारो कोटी रूपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आमदार नितीन देशमुखांची शंका आहे. 

वर्ष २०२३-२४ मधील खरीप आणि रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा (Crop Insurance) योजनेसाठी कागदपत्रे कृषी विभागाला अनेकदा मागणी करूनही सादर केली नाही. यामुळे विमा कंपनी 'एचडीएफसी अर्गो'च्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्य प्रतिनिधी प्रकाश श्रीवास्तव आणि विभागीय प्रतिनिधी सुनिल भालेराव यांच्यावर गुन्हे दाखल केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG ships : मोठी बातमी! नागपूरची २ जहाजे इराणच्या हॉर्मुझमध्ये अडकली, केंद्र सरकारनं दिले महत्त्वाचे आदेश

Maharashtra Live News Update : घरगुती गॅसचा अवैध वापर केल्या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल

Vicky Kaushal : विकी कौशलने व्यक्त केली मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा, आवडता दिग्दर्शकही सांगितला

Henna Side Effects : केसांना मेहंदी लावताय? मग थांबा 'हे' नुकसान आधी जाणून घ्या

Original Paithani Saree: गुढीपाडव्याला नेसण्यासाठी ओरिजनल पैठणी साडी कशी ओळखायची?

SCROLL FOR NEXT