अल्पभूधारक युवा शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; पाळण्याच्या दोरीला घेतला गळफास
अल्पभूधारक युवा शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; पाळण्याच्या दोरीला घेतला गळफास जयेश गावंडे
ऍग्रो वन

अल्पभूधारक युवा शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; पाळण्याच्या दोरीला घेतला गळफास

अॅड. जयेश गावंडे

अकोला- बार्शीटाकळी तालुक्यातल्या सायखेड येथे एका अल्पभूधारक युवा शेतकऱ्याने सततची नापिकी आणि कर्जाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपविली आहे. या शेतकऱ्याने सहा महिन्याच्या बाळाच्या पाळण्याच्या दोरीला गळफास घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नारायण हरिचंद्र पिंपळकर असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे (Farmer) नाव आहे. गळफास घेताना पत्नी व नातेवाईकांना दिसताच त्यांनी आरडाओरड केली. परंतु त्यांना नारायणला वाचविण्यात यश आले नाही.(Akola Farmer Committed Suicide)

हे देखील पहा -

मृतकाचा भाऊ दिनेश पिंपळकर यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून बार्शीटाकळी पोलीस घटनास्थळी गाठून पंचनामा केला. शेतकरी नारायण पिंपळकर याचे पश्चात आई, भाऊ,बहिणी, पत्नी, ५ वर्षाची मुलगी व सहा महिन्याचा चिमुकला आहे. दोन वर्षापूर्वी आई सुमनबाई यांच्या नावे असलेल्या शेतीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक धाबा येथून घेतलेले पीक कर्ज थकित होते. त्यापैकी काही कर्ज माफ झाले.

त्यानंतर आईने शेतीवरील हक्कसोड करून दोन एकर शेती नारायण च्या नावे केली. तेव्हापासून सततची नापिकी, दुष्काळी स्थिती उद्भवल्याने नारायण हा पूर्वी आईच्या नावे असलेले ९६ हजार रुपये थकित कर्ज परतफेड करू शकला नाही आजही ते कर्ज थकीत राहिले .परिणामी मोलमजुरी करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : आम्ही कायम भांडत रहावं आणि...; आदित्य ठाकरेंच्या आरोंपांवर दीपक केसरकरांचा पलटवार

Today's Marathi News Live : उजनी धरणातून 10 मे रोजी सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात येणार

Health Tips: सकाळी आंघोळीच्या पाण्यात 'ही' एक गोष्ट मिसळा; आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याविरोधात भाजप युवा मोर्चा आक्रमक; नागपुरातील निवास्थानाबाहेर निदर्शने

Mumbai News: नोकरीसाठी मराठी माणूस नको,पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कंपनीने मागितली माफी; काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT