28 वर्षांनंतर भारत- पाकिस्तान सीमेवरील शेतकऱ्यांना करता येणार शेती Saam tv
ऍग्रो वन

28 वर्षांनंतर भारत- पाकिस्तान सीमेवरील शेतकऱ्यांना करता येणार शेती

1992 पासून शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवर शेती करता येत नव्हती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

देशाच्या सीमाभागात आजही अनेक स्थानिक लोकांच्या शेतजमिनी (Farmland) आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्यांना देशाच्या सीमाभागात शेती करण्याची परवानगी नव्हती. मात्र आता राजस्थानातीळ सीमाभागात राहणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या इंडो-पाक सीमेवर (India- Pakistan Border) या शेतकऱ्यांना आपल्या शेतजमीनींवर शेती करण्याची परवानगी देण्यात आली आहे. सीमा सुरक्षा बलाची 9 Border Security Force) परवानगी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये आनंदाची लाट आहे. सीमा भागात असणाऱ्या शेतकऱ्यांना 28 वर्षानंतर त्यांच्या शेतात शेती करता येणार आहे. पंजाबनंतर राजस्थान हे दुसरे राज्य असेल, जेथील शेतकरी पाकिस्तानच्या सीमाभागात शेती करणार आहेत. (After 28 years, farmers on the India-Pakistan border will be able to cultivate)

हे देखील पहा -

भारत- पाकिस्तानच्या सीमाभागात शेतजमीनी असणाऱ्या शेतकऱ्यांशी काही दिवसांपुर्वी चर्चा केली. आता सीमा सुरक्षा बलाकडून यासाठी तयारी सुरु करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना सुरक्षितरित्या शेती करता यावी यासाठी नवीन दरवाजेही लावण्यात आले आहेत. राजस्थानमध्ये असे बरेच शेतकरी आहेत ज्यांची जमीन भारत-पाक सीमेवर तारबंदी आणि झीरो पॉइंट आहे. सध्या या ठिकाणी शेती करण्यास परवानगी नाही. त्या बदल्यात शेतकर्‍यांना नुकसान भरपाईदेखील दिली जात नाही, की या जमिनीवर शेती करण्याची परवानगी देखील नाही. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील शेतकरी सीमाभागातील आपल्या शेतजमिनींवर शेती करण्याची मागणी करत होते. या मागणीचा विचार करता आता सीमा सपरक्षा बलाने यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 1992 पासून शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवर शेती करता येत नव्हती. त्यावेळी अशा शेतकर्‍यांची एकूण संख्या १९५९ इतकी होती. आता ही संख्या दहा हजारांवर पोहचली आहे. राजस्थानातील रामसर सेडवा चौहटन गडरा भागातील शेतकऱ्यांना याचा प्रचंड फटका बसला आहे. यासंदर्भात एकतर शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी किंवा त्यांना शेती करण्यास परवानगी द्यावी, असे आदेश उच्च न्यायालयाने सरकारला दिले होते.

त्यानंतर सीमा सुरक्षा बलाने हा निर्णय घेतला आहे. आता या भागातील शेतकऱ्यांना पुन्हा शेतीची कामे करता येणार आहे. सीमाभागातील शेतकऱ्यांना आपल्य़ा जमीनीत शेती करण्यासाठी विशेष पास आणि आयडी कार्ड दिले जाणार आहे. सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत त्यांना शेतीत काम करण्याची मुभा असेल. पुरुषांसह महिलांनाही शेतीत काम करण्याची मुभा असेल. मात्र सायंकाळी घरी परतताना त्याची कडक तपासणी केली जाणार आहे.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : सोन्याचे भाव जसे वाढतात, तसे भविष्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार - छगन भुजबळ

IPL 2025 Auction: केएल राहुल ते रिषभ पंत.. या खेळाडूंना लय डिमांड; बेस प्राईज 2 कोटी, पाहा संपूर्ण यादी

Dark Circle: डोळ्यांखालील डार्क सर्कल घालवायचे तर 'या' घरगुती टिप्स फॅालो करा

Raj Thackeray Speech : राज ठाकरेंची अख्ख्या महाराष्ट्राला साद; एकदा सत्ता हातात देऊन बघा!

Bengaluru Accident: बेंगळुरूच्या रस्त्यावर थरार, आलिशान कारनं तरुणीला उडवले

SCROLL FOR NEXT