RTO परिक्षेचा घोळ: सरकार आणखी किती स्वप्निल तयार करणार?

अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या जागी पुढील पात्र उमेदवारांची प्रतीक्षा यादी मात्र कोरोना महामारीच्या कारणामुळे लावण्यात आलेली नाही.
RTO परिक्षेचा घोळ: सरकार आणखी किती स्वप्निल तयार करणार?
RTO परिक्षेचा घोळ: सरकार आणखी किती स्वप्निल तयार करणार?Saam Tv
Published On

राजकुमार देशमुख

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) दि. ६ ऑगस्ट २०१७ रोजी सहायक मोटार वाहन निरीक्षक (AMVI) या पदाच्या ८३३ जागांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. सदर परीक्षेचा निकाल ९ सप्टेंबर २०१९ रोजी लागला होता. एकूण ८३३ जागांसाठी शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांची नियुक्ती पूर्वी कागदपत्र पडताळणी करण्यात आली. कागदपत्र पडताळणीतून अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या जागी अनुक्रमे १० जुलै आणि २६ ऑगस्ट २०२० रोजी प्रतीक्षा यादी (Waiting List) लावण्यात आली. दोन्ही प्रतीक्षा यादीतून शिफारस केलेल्या उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीतून सुद्धा अनेक उमेदवार अपात्र ठरले आहेत. (#MPSCबळीस्वप्नीललान्यायद्या)

अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या जागी पुढील पात्र उमेदवारांची प्रतीक्षा यादी मात्र कोरोना महामारीच्या कारणामुळे लावण्यात आलेली नाही. एकूण ८३३ जागांसाठी परीक्षा झालेली असताना पूर्ण ८३३ जागांवर पात्र उमेदवारांची नियुक्ती झालेली नाही. ८३३ पैकी जवळपास 650 नियुक्त्या पूर्ण आहेत. उर्वारीत उमेदवारांची नियुक्ती अजून करण्यात येत नाहीये. कागदपत्रे पडताळणीतुन अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या जागी पुढील पात्र उमेदवारांची प्रतीक्षा यादी जाहिर करावी अशी मागणी उमेदवार करत आहेत.

RTO परिक्षेचा घोळ: सरकार आणखी किती स्वप्निल तयार करणार?
MPSC: संर्सगजन्य आजाराला विद्यार्थी बळी का पडतात?

२०१७ साली झालेल्या ८३३ जागांसाठी पूर्ण ८३३ जागा भरण्यात याव्यात अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. कोरोना महामारीच्या कारणामुळे जरी नियुक्ती प्रक्रियेस विलंब झाला असला तरी याचा फटका पात्र उमेदवारांना बसू नये व त्यांना तात्काळ नियुक्ती देण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. मोटार वाहन विभाग आणि एमपीएससी यांच्यात समनवय नसल्याने नियुक्ती प्रक्रिया खोळंबली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोर्टाची पायरी चढावी लागत आहे.

२०१७ साली झालेल्या AMVI परीक्षेसाठी शिफारस केलेल्या ८३३ उमेदवरांपैकी अनेक उमेदवार कागदपत्रे पडताळणीतुन बाहेर पडले आहेत, त्यामुळे पूर्ण ८३३ जागा भरेपर्यंत प्रतीक्षा यादीतुन पुढील उमेदवारांची निवड करण्यात आलेली नाही. अजूनही २०० पेक्षा जास्त उमेदवार हे नियुक्ततेच्या प्रतीक्षेत आहेत.

राजकुमार देशमुख

नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेला उमेदवार

२०१७ साली झालेल्या AMVI पदासाठी पूर्ण ८३३ जागांवर नियुक्ती पूर्ण होण्यागोदारच जानेवारी २०२० मध्ये याच पदासाठी नवीन जाहिरात काढण्यात आली. ज्याची पूर्व परीक्षा मार्च २०२० मध्ये झाली आहे.

आकाश कांबळे

विद्यार्थी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com