Beed : अवघ्या २४ वर्षाच्या शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या! विनोद जिरे
ऍग्रो वन

Beed : अवघ्या २४ वर्षाच्या शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या!

बीडमध्ये शेतकऱ्यांचे आत्महत्यासत्र सुरूच; केवळ पाच दिवसात तीन आत्महत्यांनी वडवणी तालुका हादरला!

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यात आत्महत्येचे सत्र सुरूच असल्याचे चित्र निर्माण झाले असून बीडच्या वडवणी तालुक्यातील खळवट लिमगावमध्ये, पुन्हा एका 24 वर्षीय तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ज्ञानेश्वर नामदेव खराडे असं आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे. ज्ञानेश्वर खराडे या अविवाहित तरुण शेतकऱ्याने, शेतात बोरीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केलीय.

हे देखील पहा :

अतिवृष्टीने शेतातील पीक वाहून गेलं. त्यात खाजगी सावकारासह सरकारी बँकेचे घेतलेल कर्ज कशाने फेडायचं ? कुटुंबाचा उदारनिर्वाह कसा करायचा? या विवंचनेतून शेतातील बोरीच्या झाडाला गळफास घेऊन, ज्ञानेश्वर खराडे या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. तर, अशाच दोन घटना मागील पाच दिवसात वडवणी तालुक्यात घडल्या आहेत. 20 ऑक्टोबर रोजी याच खळवट लिमगावमध्ये 34 वर्षीय सिध्देश्वर धर्मराज फरताडे या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

तर कवडगाव येथील 35 वर्षीय शेतकरी दिलीप शेषेराव शेजाळ या शेतकऱ्याने 23 ऑक्टोबर रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली. दरम्यान, अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाल्यानंतरही, शासनाची उदासीनता आणि सरकारमधील मंत्र्यांची केवळ आश्‍वासनांची खैरात, यामुळं शेतकरी हतबल झाला आहे. हक्काचा भरलेला पिक विमा देखील मिळत नाही, यामुळे आता या बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा आत्महत्याच सत्र सुरू झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonalee Kulkarni : ही दोस्ती तुटायची नाय! दीपिका-सोनालीची खास भेट, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

हे वागणं बरं नव्हं! प्रवाशांनी खचाखच भरलेल्या मेट्रोत महिलेचा विचित्र डान्स; व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांनी डोक्याला लावला हात

Avoid With Tea: चहा प्यायचाय? मग 'या' गोष्टींसोबत कधीही पिऊ नका, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

Friday Horoscope Update : काही गुपितं इतरांना सांगणे टाळा, वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT