आज पाहा

नक्की वाचा | 24 तासात इतके वाढले कोरोना रूग्ण

साम टीव्ही न्यूज

देशभरातील एकूण ५ लाख ४८ हजार ३१८ करोनाबाधितांमध्ये, सध्या उपचार सुरू असलेले २ लाख १० हजार १२० रुग्ण, उपचारानंतर सुट्टी देण्यात आलेले ३ लाख २१ हजार ७२३ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १६ हजार ४७५ जणांचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणुचा प्रादुर्भाव देशात अद्यापही झपाट्याने वाढतच आहे. मागील चोवीस तासांत देशभरात तब्बल १९ हजार ४५९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर, ३८० जणांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ५ लाख ४८ हजार ३१८ वर पोहचली आहे.

कोविड १९ चाचण्यांसाठी घरगुती वापराचे चाचणी संच लवकरच प्रत्यक्षात येणार असून दिल्लीची भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) व पुण्याची राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल) या दोन संस्था पर्यायी चाचणी पद्धत शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. लोक घरीच ही चाचणी करू शकतील व लगेच त्याचा निकालही त्यांना मिळेल. औद्योगिक व वैज्ञानिक संशोधन परिषद म्हणजे सीएसआयआरच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प हाती घेण्यात आला असून त्याला मायक्रोसॉफ्ट इंडिया या संस्थेने आर्थिक मदत दिली आहे. एक महिन्यात हा संच तयार होणार आहे. या प्रयोगात सहभागी वैज्ञानिकांनी कोविड विरोधात एलायझा यावर आधारित चाचणी विकसित केली आहे.

१ जूनपासून ३ लाख ३८ हजार ३२४ रुग्णांची भर पडली आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात सलग पाचव्या दिवशी १५ हजारांपेक्षा जास्त रुग्णवाढ झाली.

WebTittle :: Read exactly | Corona patients increased so much in 24 hours

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM Eknath Shinde: उद्धव ठाकरेंची आधीच विकेट गेलीय; संजय निरुपम यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल

Cancer Health Tips: कर्करोग टाळाण्यासाठी जीवनशैलीत करा 'हे' छोटे बदल

Maharashtra Politics: राज्यात एक मंत्रिपद आणि विधानसभा निवडणुकीत RPI ला 10 जागा मिळणार: रामदास आठवले

Vastu Tips: या दिवशी झाडू खरेदी करा, गरीबी होईल दूर

Today's Marathi News Live : ​10 जूनपर्यंत वाघनखा महाराष्ट्रात येण्याची शक्यता, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

SCROLL FOR NEXT