आज पाहा

लेफ्टनंट कर्नल धोनी आजपासून ऑन ड्युटी; अशी असेल धोनीची ड्युटी?

सकाळ न्यूज नेटवर्क

भारताचा माजी कर्णधार आणि लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंह धोनी आजपासून काश्मिरमध्ये लेफ्टनंट कर्नल म्हणून रुजू झालाय. काश्मीरमधल्या १०६ टेरिटोरियल आर्मी बटालियनमध्ये तो सहभागी झालाय. ३१ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत तो व्हिक्टर फोर्समधील जवानांसोबत प्रशिक्षण घेणाराय.

धोनी गस्त, गार्ड आणि पोस्ट ड्युटी करणार असून या ठिकाणी तो १५ दिवस राहणाराय. धोनीच्या विनंतीवरूनच ही नियुक्ती करण्यात आल्याचंही कळतंय. हा भाग मागच्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांचे तळ बनलाय. त्यामुळं धोनीची इथली पोस्टींग महत्वाचे मानले जातेय. 

धोनी ज्या बटालियनमध्ये सहभागी होऊन पहारा देणाराय ती बटालियन विशेष सैनिकांची आहे. यात देशातले प्रत्येक विभागातून आलेले सैनिक आहेत. धोनीकडे या दरम्य़ान १९ किलोची बॅग असणाराय.

१९ किलो वजनाच्या बॅगेत नेमकं काय ?

  • धोनीकडे पाच किलो वजनाच्या मॅग्झिन
  • 3 किलोचा पोशाख
  • 2 किलोचे बूट
  • 4 किलोचे 3 ते 6 ग्रेनेड
  • 1 किलोचे हॅल्मेट
  • 4 किलोचे बुलेटप्रुफ जॅकेट  असे एकूण 19 किलो वजन असणाराय. 

धोनीची ड्युटी नेमकी कशी असेल ?

गस्त - श्रीनगरच्या बादामी बाग कँट एरियामध्ये धोनी ८-१० सैनिकांच्या ग्रुपमध्ये गस्त घालेल. यावेळी त्याला बुलेटप्रूफ जॅकेट, एके ४७, रायफल, आणि ६ ग्रेनेड दिले जातील. या ड्युटीचा हेतू एकमेकांशी संवाद साधणं आणि त्या भागातली गुप्त माहिती गोळा करणं असेल.

गार्ड ड्युटी - युनिटची सुरक्षा करण्याचं काम धोनीला यात मिळेल. हे काम ४-४ तासांच्या शिफ्टमध्ये होईल. ही सकाळ आणि रात्री दोन्ही वेळी करायची ड्युटी आहे. सकाळच्या ड्युटीवेळी धोनीला पहाटे ४ वाजता उठावं लागेल. रात्रीची ड्यटी असेल तेव्हा सकाळी लवकर उठण्यातून सूट मिळेल.

पोस्ट ड्युटी - बंकर मध्ये पापणीही न लवता उभं राहावं लागेल. ही ड्युटी २ तासांच्या शिफ्टमध्ये ३ वेळा करावी लागणारे. ही ड्युटी धोनीच्या धैर्याची परिक्षा घेणारी असेल. शांत उभं राहायचं आणि न हलता लोकांना येता - जाता बघत राहणं हे पोस्ट ड्युटीचं अत्यंत मह्त्त्वाचं काम असतं.

१५ दिवस धोनीची खडतर परिक्षा असेल, त्यामुळं धोनीच्या मिशन काश्मीरला खुप शुभेच्छा.

Webtitle : marathi news lieutenant colonel mahendrasingh dhoni on duty know about his duty


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याविरोधात भाजप युवा मोर्चा आक्रमक; नागपुरातील निवास्थानाबाहेर निदर्शने

Today's Marathi News Live : मराठी भाषेला मागच्या १० वर्षांपासून मोदी सरकारने अभिजात दर्जा दिला नाही; जयराम रमेश

Mumbai News: नोकरीसाठी मराठी माणूस नको,पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कंपनीने मागितली माफी; काय आहे प्रकरण

Dia Mirza : हँसता हुआ नूरानी चेहरा; काली ज़ुल्फ़ें रंग सुनहरा...

Skin Care Tips: चमकदार त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचे फायदे; जाणून घ्या

SCROLL FOR NEXT