Bogus Seeds : सव्वा लाखाचे प्रतिबंधित बोगस बियाणे जप्त; विक्रेत्यास घेतले ताब्यात

Yavatmal News : खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतकरी वर्ग खरीप पूर्व मशागतीच्या कामांत व्यस्त आहे. तर दुसरीकडे बाजारात वेगवेगळ्या कंपनीचे कापसासह इतर बियाणे विक्रीसाठी दाखल झाले आहेत
Bogus Seeds
Bogus SeedsSaam tv

संजय राठोड

यवतमाळ : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची तयारी सुरु झाली. बागायतदार शेतकरी मे महिन्याच्या शेवटच्या (Yavatmal) आठवड्यात कापसाची लागवड करत असतात. त्या अनुषंगाने बाजारात बियाणे दाखल होण्यास सुरवात झाली आहे. दरम्यान राज्यात प्रतिबंधित असलेले बियाणे येत असून यवतमाळमध्ये असे सव्वा लाखाचे बियाणे जप्त करण्यात आले आहे. 

Bogus Seeds
Water Crisis : मृतसाठ्यातून होणार पाण्याचा उपसा; इमर्जन्सी पंप सुरू करण्याची तयारी

खरीप हंगाम तोंडावर आला असून (Farmer) शेतकरी वर्ग खरीप पूर्व मशागतीच्या कामांत व्यस्त आहे. तर दुसरीकडे बाजारात वेगवेगळ्या कंपनीचे कापसासह इतर बियाणे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. दरम्यान कृषी विभागाकडून कापसाचे काही बियाणे विक्रीस प्रतिबंधित केले आहेत. तरी देखील यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील चिंचाळा येथे कापसाचे बोगस बियाणे (Bogus Seeds) विक्री केली जात होती. हे बियाणे विक्री करणाऱ्यावर कृषी विभागाच्या पथकाने कारवाई केली. 

Bogus Seeds
Nashik News : दुष्काळी परिस्थितीमुळे दोन एकर पेरूची बाग तोडली; शेतकऱ्याचे नुकसान

विक्रेत्यास घेतले ताब्यात 

कृषी विभागाच्या (Agriculture Department) कारवाईत ७८ बोगस बियाण्यांचे पाकिट ताब्यात घेण्यात आले असून, पोलिस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विलास चिकटे (रा. चिंचाळा) याला ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून ७८ कापूस बियाण्यांचे पाकिट जप्त करण्यात आले आहेत. त्या पाकिटावर ८६३ रूपये किंमत असून एकूण १ लाख १ हजार रूपयांचा मुद्देमालासह विकास चिकटे यास ताब्यात घेण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com