- मनोज जयस्वाल
Washim News : हळदीला याेग्य दर मिळावा यासाठी आज (शनिवार) शेतक-यांनी एकत्र येत नांदेड अकाेला महामार्ग (nanded akola highway) राेखून धरला. जय जवान जय किसान अशा घाेषणा देत जाेपर्यंत याेग्य दर जाहीर केला जात नाही ताेपर्यंत आंदाेलन सुरुच राहणार अशी भूमिका घेत शेतक-यांनी महामार्गावर ठिय्या मांडला. (Maharashtra News)
वाशीम कृशी उत्पन्न बाजार समितीमध्ये (washim krushi utpanna bazar samiti) हळदीला (turmeric) मिळणारा दर कमी असल्याने शेतकरी वर्ग नाराज झाला आहे. याच नाराजीतून शेतकऱ्यांनी बाजारात सूरू असलेली हळदीची खरेदी बंद पाडली. त्यानंतर नांदेड अकोला महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले.
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत दर शनिवारी हळदीची मोठ्या प्रमाणात खरेदी होते. आजही वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात शेतक-यांनी हळद आणली हाेती. हळदीला सहा हजार रुपयांपेक्षा अधिक भाव मिळत नव्हता. त्यामुळे हळद खरेदी बंद पाडून आंदाेलन छेडले.
हळदीला जोपर्यंत शेतकऱ्यांना सात हजार रुपयांपर्यंत भाव मिळत नाही तोपर्यंत हळदीची खरेदी होऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेत शेतकऱ्यांनी घेतला आहे. या आंदाेलनात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.