Soybean Crop: कापणी केलेल्‍या सोयाबीनचे पावसाने नुकसान; शेतकरी हवालदील

कापणी केलेल्‍या सोयाबीनचे पावसाने नुकसान; शेतकरी हवालदील
Soybean Crop
Soybean CropSaam tv
Published On: 

चेतन व्यास

वर्धा : जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची सवंगणी केली आहे. पण, पावसाने सवंगणी केलेल सोयाबीन (Soybean) भिजले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या (Farmer) तोंडाशी आलेला घास हिरावला आहे. या नुकसानीने शेतकरी हवालदिल झाले आहेत. (LIVE Marathi News)

Soybean Crop
Nandurbar: परिवार घरात अन्‌ अंगणातील झाडावर पडली वीज; फांद्यांनी मोडले घर

वर्ध्याच्या (Wardha) नागापूर येथील संजय जिकार यांना सोयाबिनची दोनदा लागवड करावी लागली. दोन दिवसांपूर्वी त्यांनी सोयाबीनची सवंगणी केली. सोयाबीनचे ढीग शेतात असताना जोरदार पाऊस (Rain) झाला. त्यात सोयाबीन भिजल्याने शेंगा खराब होत असून यात त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

दुबार पेरणीनंतरही पावसाने नुकसान

हंगामाच्या सुरूवातीला जुलै, ऑगस्ट महिन्यात सततचा पाऊस, अतिवृष्टीने पिकांचे अतोनात नुकसान झाले. शेतकर्‍यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. अनेकांची शेती पडीत आहे. अशा स्थितीत काही शेतीत सावरलेले सोयाबीन सवंगणीला आलेले आहे. पण, सवंगणीला आलेल्या सोयाबीनसह सवंगणी केलेल्या सोयाबीनला पावसाचा फटका बसत आहे. आधीच शेतकरी अडचणीत असून त्यात आता आलेल्या पावसाने सवंगणी केलेले सोयाबीन खराब होत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.