Nandurbar: परिवार घरात अन्‌ अंगणातील झाडावर पडली वीज; फांद्यांनी मोडले घर

परिवार घरात अन्‌ अंगणातील झाडावर पडली वीज; फांद्यांनी मोडले घर
Lightning Strike
Lightning StrikeSaam tv

नंदुरबार : तळोदा तालुक्यातील बोरद येथे परतीच्या पावसात कुंभार गल्लीत एका लिंबाच्या झाडावर वीज कोसळली. यामुळे लिंबाच्या (Nandurbar News) झाडाच्या फांद्या घराच्या छतावर येऊन आदळल्या. यावेळी परिवार घरात होता. सुदैवाने मात्र जीवितहानी झाली नाही. (Latest Marathi News)

Lightning Strike
Weather Updates : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना अलर्ट

अचानक सोसाट्याचा वारा सुरू झाला आणि पावसालाही (Rain) सुरुवात झाली. अशा परिस्थितीत कुंभार गल्लीत रवींद्र राजपूत, संदीप राजपूत, तुळशीराम कुंभार, मिलिंद पाटील, लाला कुंभार हे घराच्या ओट्यावर उभे राहून पावसाची परिस्थिती न्याहळत होते. याच वेळेस आकाशातून जोराचा आवाज झाला आणि एक वीज (Lightning Strike) अचानक समोरच्या घराशेजारी असलेल्या लिंबाच्या झाडावर कोसळली. त्यामुळे झाडाच्या फांद्या तुटून राजेंद्र रमण कुंभार यांच्या घराच्या छतावर जाऊन पडल्या. सुदैवाने या घटनेमुळे कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. घरातील छत हे पत्र्याचे असल्याने या फांद्या पत्र्यावर जाऊन जोरात आदळल्या त्यामुळे घराच्या भिंतींना तडा गेला आहे.

परिवार होता घरात

प्रत्यक्षदर्शी मिलिंद पाटील यांनी सांगितले, की मी माझ्या डोळ्यादेखत वीज पडताना त्या ठिकाणी पाहिली. जोराची वीज कडाडली आणि क्षणाचाही विलंब न होता अचानक लिंबाच्या झाडावर कोसळली. वीज कोसळल्या क्षणी त्याठिकाणी झाडाच्या फांद्यांचा अचानक जोरात आवाज झाला आणि त्या फांद्या घराच्या छतावर येऊन आदळल्या. घरात असलेले रमण कुंभार तसेच त्यांचा परिवार बाहेर कसला प्रकारचा आवाज झाला; हे पाहण्यासाठी बाहेर निघाले. काय झाले हे त्यांनाही कळले नाही. परंतु प्रत्यक्षदर्शनी त्यांना सांगितले की तुमच्या घराच्या शेजारी असलेल्या लिंबाच्या झाडावर वीज कोसळून झाडाच्या फांद्या तुमच्या घराच्या छतावर पडल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com