Parbhani News : शेतक-यांनाे! साेयाबीन विक्रीची पक्की पावती घ्या अन्यथा...

शेतक-यांनी अधिकृत व्यापाऱ्यांकडेच सोयाबीन विकणे गरजेचे आहे असेही कळविण्यात आले आहे.
soyabean price, farmers,
soyabean price, farmers, saam tv
Published On

Parbhani News : परभणी जिल्हात खंड स्वरूपाच्या पावसाने ज्या शेतकऱ्यांच्या हाती सोयाबीन पीक लागले. ते शेतकरी आता सोयाबीनची काढणी करून बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. मात्र सोयाबीनचे हंगामापूर्वीच बाजारात भाव पडले आहेत. (Maharashtra News)

soyabean price, farmers,
Karnataka Security At Kognoli Toll Plaza : महाराष्ट्रातील मंत्र्यांसह नेत्यांना बेळगावात नाे एंट्री, जिल्हाधिका-यांचा आदेश

हंगाम सुरू होताच सोयाबीनला प्रति क्विंटल पाच हजार रुपयांचा भाव मिळणे अपेक्षित होता. मात्र 4500 ते 4600 रुपयांपर्यंतच सोयाबीन व्यापाऱ्यांकडून प्रतिक्विंटलने विकत घेतले जात असल्याने शेतकऱ्यांची मुस्कटदाबी होत आहे. यामुळे शेतक-यांत तीव्र नाराजी पसरली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान झाल्यानंतर त्या जाहीर अनुदान मिळविण्यासाठी पक्की पावती असणे गरजेचे आहे. त्यामुळे सोयाबीन विक्री केल्यानंतर संबंधित व्यापाऱ्यांकडून पक्की पावती घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

soyabean price, farmers,
Ravikant Tupkar News : शेतक-यांनाे! नेत्यांच्या गाड्या आडवा, जाब विचारा : रविकांत तुपकर

जिल्ह्यात यंदा 2 लाख 50 हजार हेक्टरमध्ये सोयाबीनचा पेरा होता. पेरणीला एक महिना उशीर झाला. त्यानंतर जुलैमध्ये खंड स्वरूपाचा पाऊस झाला. ऑगस्टमध्ये पावसाने उघडीप दिली. तरीही सोयाबीन पीक काही ठिकाणी तग धरून राहिले. प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणानुसार 50टक्क्यांहून अधिक घट पिकाच्या उत्पादनात झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

soyabean price, farmers,
Antarwali Sarati News : उदयनराजे भाेसलेंच्या भेटीनंतर मनोज जरांगे पाटील उपाेषण स्थगित करणार? (पाहा व्हिडिओ)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com