

Maval News : मावळातील संत तुकाराम सहकारी साखर कारखाना यांची 34 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यात 2634 रुपये इतका ऊसाला भाव देण्यात आला असला तरी दोनशे रुपये वाढीव अधिकचा भाव देण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी शेतकऱ्यांची गोड होणार आहे. (Maharashtra News)
याबराेबरच भंडारा डोंगर या ठिकाणी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच राम मंदिरांच्या धर्तीवर भव्य दिव्य मंदिर उभारण्यात येणार आहे. त्यासाठी देखील या कारखान्याकडून एक कोटींचा निधी देण्यात येणार असल्याचं साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी साम टीव्हीशी बाेलाताना सांगितले.
हा निधी कामगार वर्ग, संचालक मंडळ आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून जमा केला जाणार आहे. याला प्रशासकीय मान्यता भेटल्यानंतर प्रत्येक उत्पादक शेतकऱ्यांकडून 200 रुपयांपैकी दहा रुपये कापले जाणार आहेत.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.