Mahableshwar: अतिवृष्टीमुळे बाधित शेतजमिन दुरुस्तीची कामे प्रशासनातर्फे सुरु : शेखर सिंह

यातून तेथील शेतकऱ्यांची शेतजमिन पुर्ववत होऊन त्यांची आर्थिक प्रगती होईल.
Mahableshwar
MahableshwarSaam TV
Published On

सातारा : जुलै महिन्यात सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमुळे (heavy rainfall) महाबळेश्वर (mahableshwar) तालुक्यातील शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातून शेतजमीनीच्या दुरुस्तीची कामे सुरु करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह (shekhar sinh) यांनी दिली.

सिंह म्हणाले जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर तालुक्यातील 1732.14 हेक्टर शेतजमिनींचे नुकसान झाले आहे. ही शेतजमिन जेसीबीच्या (jcb) माध्यमातून दुरुस्त करण्यात येणार आहे. महाबळेश्वर तालुक्यातील 81 गावांमध्ये जेसीबीच्या माध्यमातून दुरुस्तीचे काम सुरु झाले आहे. शेतजमिनीच्या दुरस्तीच्या कामासाठी जेसीबीधारकांना प्रशासनामार्फत मोफत इंधन देण्यात येणार आहे.

जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत खंडाळा तालुक्यातील 84 जेसीबी, 10 पोकलेन, 6 डंपर, 4 ट्रॅक्टर या कामासाठी सामाजिक दायित्व म्हणून महाबळेश्वर (mahableshwar) येथे काम करण्यास तयार झाले आहेत. यासाठी खंडाळ्याचे तहसीलदार दशरथ काळे यांच्या प्रयत्नांमुळे ही यंत्रसामुग्री मिळाली आहे.

Mahableshwar
Whatsapp Update: तुम्ही Whatsapp ग्रुप अ‍ॅडमिन आहात? जाणून घ्या तुम्हांला मिळालेला नवा अधिकार

या कामांमुळे शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या शेतजमिनीची दुरुस्ती होवून त्यांना एक प्रकारे जिल्हा प्रशासनामार्फत दिलासा देण्याचे काम करण्यात येत आहे. यातून तेथील शेतकऱ्यांची शेतजमिन पुर्ववत होऊन त्यांची आर्थिक प्रगती होईल.

या कामांसाठी पालकमंत्री बाळासाहेब पाटील (balasaheb patil) यांनी जिल्हा वार्षिक योजनेमधून निधी दिला आहे. तर या कामासाठी आमदार मकरंद पाटील (makrand patil) यांनी सतत पाठपुरावा केला आहे. तसेच प्रांताधिकारी राजेंद्र जाधव व तहसीलदार सुषमा पाटील या सुरु असलेल्या कामांवर लक्ष ठेवून आहेत.

edited by : siddharth latkar

Mahableshwar
Sindhudurg: पीए राकेश परबची पाेलिस काेठडीत रवानगी; नितेश राणेंच्या जामीन अर्जावर आज निकाल
Mahableshwar
Police: हप्ता वसूली व्हायरल क्लिप प्रकरणी २ पाेलिसांचे निलंबन; निरीक्षकाची मुख्यालयात बदली
Mahableshwar
Maharashtra: सराफ व्यावसायिकास त्रास दिल्याने अधिकाऱ्यासह सहा पोलिस निलंबित

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com