Pandharpur News : दूधाच्या दरासाठी पंढरपूर- विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर रयत क्रांतीचा रास्ता राेकाे

दूधात होणारी भेसळ रोखावी अन्यथा सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडू असा इशारा आंदाेलकांनी दिला.
Milk, Pandharpur, Rayat Kranti Sanghatana
Milk, Pandharpur, Rayat Kranti Sanghatanasaam tv
Published On

Pandharpur News : गाईच्या दूधाला 40 रूपये व म्हशीच्या दूधाला प्रती लिटर 70 रूपये भाव मिळावा या मागणीसाठी आज (साेमवार) पंढरपूर - विजयपूर या राष्ट्रीय महामार्गावर (pandharpur vijapur national highway) रयत क्रांती संघटनेच्या (rayat kranti sanghatana) यांच्यावतीने अनवली चौकात रास्ता रोको आंदोलन (rasta roko aandolan) केले. (Maharashtra News)

Milk, Pandharpur, Rayat Kranti Sanghatana
Pune Zilla Parishad News : भाजे गाव ठरलं Smart Village; सरपंच चेतन मानकर यांच्या प्रयत्नांना यश

गाईच्या दूधाला प्रती लिटर 40 रूपये भाव मिळावा, दूधाची राज्य सरकारने हमीभावाने खरेदी करावी, सहकारी व खासगी दूध संस्थांचे लेखा परीक्षण करावे या मागण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष दीपक भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली दूध उत्पादन शेतकऱ्यांनी आजचे आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध केला.

Milk, Pandharpur, Rayat Kranti Sanghatana
Satara Crime News : पुण्यात राहणा-या सहाय्यक दुय्यम निबंधकाने साता-यात घेतली लाच; ACB ने घेतलं ताब्यात

दूधामध्ये होणारी भेसळ रोखावी अन्यथा सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा श्री. भोसले यांनी दिला आहे. ऐन उन्हाळ्यात दूधाचे भाव पडल्याने दूध उत्पादक शेतक-यांचे आर्थिक नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com