Gauri Ganpati चे आगमन, पावसाचे थैमान; पालेभाज्यांचे दर भिडले गगनाला; गृहिणींचे बजेट काेलमडले

त्यातच हवामान विभागाकडून नाशिक जिल्ह्याला पावसाचा अलर्ट दिला आहे.
leafy vegetables, nashik news
leafy vegetables, nashik newssaam tv
Published On: 

- तबरेज शेख

Nashik News : नाशिक येथे सुरू असलेल्या पावसाचा परिणाम आता पालेभाज्यांवर जाणवू लागला आहे. पावसामुळे आवक घटल्याने पालेभाज्यांचे दरात मोठी वाढ झाली आहे. गाैरी गणपतीच्या सणाला भाज्या महागाल्याने गृहिणींचे आर्थिक बजेट काेलमडले आहे (Maharashtra News)

leafy vegetables, nashik news
Ganesh Festival 2023 : डाॅक्टरांची तक्रार, गणेशाेत्सव मंडळाच्या 25 कार्यकर्त्यांवर गुन्हा; शहर पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी बदली

नाशिकच्या बाजारात कोथिंबीर जुडी मागे 30 ते 40 रुपये तर मेथी तीस ते 80 रुपये झाली आहे. कांदा पात 35 ते 50 रुपयांना जुडी तर पुदिना 10 रुपये जुडीला मोजावे लागत आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला झळ बसत आहे.

leafy vegetables, nashik news
Aditya Thackeray In Kokan : तुमचं आमचं नव्हे हे गद्दार, गँगस्टर, बिल्डर, कॉन्ट्रॅक्टरांचे सरकार : आदित्य ठाकरे

त्यातच हवामान विभागाकडून नाशिक जिल्ह्याला पावसाचा अलर्ट देण्यात आल्यामुळे पाले भाज्यांचे दर आणखीन वाढणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामध्ये मेथी, कोथिंबीर, कांदापात, पुदिना आणि शेपू या भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढतील असे सांगितले जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com