परभणी : गेल्या काही दिवसांपासून परभणी जिल्ह्यात फुलोरा, दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या हरभऱ्यावर (Parbhani) आता ढगाळ वातावरणाचे संकट घोंगावत आहे. शिवाय आता करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने (Farmer) शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त होत असून, विविध फवारण्यांवर भर दिला जात आहे. (Live Marathi News)
रब्बी हंगामात (Rabi Crops) हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे. मात्र, अवकाळी पावसाने पिकाचे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांना हरभऱ्याची दुबार पेरणी करावी लागली. सद्यस्थितीत फुलोरा, दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या हरभरा पिकाला ढगाळ वातावरण व धुक्याचा फटका बसत आहे. तसेच करप्या रोगाचा प्रादुर्भावही दिसून येत आहे. रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकरी त्यावर फवारणी करत आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
उत्पादनात घट होण्याची शक्यता
हरभऱ्याला एन बहरात असून त्याला फुल व दाणे भरण्याची वेळ आहे. अशात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने त्याचा फटका हरभऱ्यावर बसत आहे. यामुळे आता हरभऱ्याच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.