Nagpur News : वादळी वारा, अवकाळी पावसाचा संत्रा बागांना फटका; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Nagpur News : हवामान खात्याने वर्तविलेला पावसाचा इशारा खरा ठरला असून विदर्भात मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.
Nagpur News
Nagpur NewsSaam tv
Published On

पराग ढोबळे 
नागपूर
: नागपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. यामुळे जिल्ह्यातील (Nagpur) संत्रा बागांना पुन्हा एकदा फटका बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे एन बहरात असलेल्या संत्री झाडावरून गळून पडल्या आहेत. यामुळे संत्री उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (Live Marathi News)

Nagpur News
Unseasonal Rain : वीज अंगावर पडल्याने एकाचा मृत्यू; बुलढाण्यात अवकाळी पावसाचा तडाखा, रब्बी पिकावर मोठा परिणाम

हवामान खात्याने वर्तविलेला (Rain) पावसाचा इशारा खरा ठरला असून विदर्भात मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. (Amravati) अमरावती, वर्धा जिल्ह्यात गारपीटीसह मुसळधार पाऊस तर चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यात शनिवारी काही भागांमध्ये मुसळधार पावसासह गारपीट झाली होती. यानंतर नागपूर जिल्ह्यात देखील वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडाखा बसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nagpur News
Rasta Roko Aandolan : मनोज जरांगे यांच्या उपोषणाला समर्थन; परभणी, लातूरमध्ये चक्काजाम आंदोलन

नागपूर जिल्ह्यात १५ फेब्रुवारीला सायंकाळी नरखेड तालुक्यातील सावरगाव भागात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. यामुळे मृग बहाराच्या संत्रा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. झाडाला लागलेली संत्री गळून पडल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. आठवडाभरात दुसऱ्यांना नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका बसलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com