Nashik News : शेतकऱ्यांसाठी खूषखबर ! NAFED करणार कांद्याची खरेदी, नाशकात नियाेजनास प्रारंभ

सद्यःस्थितीत बाजारात दर पडलेले असल्याने त्यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.
Onion, Nafed
Onion, Nafed Saam Tv
Published On: 

Nashik News : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काहीशी दिलासादायक बातमी आहे. पुढील ३ ते ४ दिवसांत नाफेडकडून (National Agricultural Cooperative Marketing Federation of India Ltd.) नाशिक (nashik) जिल्ह्यात कांदा खरेदी (purchasing of onion) सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कांदा खरेदीसाठी नाफेडकडून पावलं उचलण्यास सुरुवात झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. (Maharashtra News)

Onion, Nafed
Shivrajyabhishek Sohala : राष्ट्रवादी संपुर्ण महाराष्ट्रात साजरा करणार शिवराज्याभिषेक साेहळा : जयंत पाटील (पाहा व्हिडिओ)

केंद्रीय ग्राहक मंत्रालयाने यावर्षी नाफेडतर्फे तीन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करून बफर स्टॉक करण्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ व राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघ या दोन नोडल एजन्सी मार्फत कांद्याची खरेदी करण्यात येणार आहे असल्याचे समजते.

Onion, Nafed
MP Balu Dhanorkar Health Update : प्रकृतीची माहिती कळताच खासदार बाळू धानोरकरांची मुलेही दिल्लीस रवाना

देवळा तालुक्यात शेतकरी उत्पादक कंपनीच्या गोडावून तपासणीसह टॅगिंगच्या कार्यवाहीला सुरुवात झाली आहे. सध्या बाजारात कांद्याला भाव मिळत नसल्यानं आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com