Latur News
Latur NewsSaam tv

Latur News : सोयाबीन, कांदा, कापूसाच्या दर वाढीसाठी शेतकरी संघटना आक्रमक; कृषी मूल्य आयोग अध्यक्षांच्या निवासस्थानासमोर ठिय्या

Latur News : यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड केली. मात्र शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळाला नाही.
Published on

संदीप भोसले 
लातूर
: यंदाच्या हंगामात सोयाबीन, कांदा, कापूस या शेतमालाला चांगला दर मिळाला नाही. यामुळे शेतकरी (Farmer) अडचणीत सापडला. यामुळे या शेतमालाला योग्य भाव द्यावा; या मागणीसाठी आज लातूरमध्ये (Latur) शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या निवासस्थानासमोर ठीय्या आंदोलन केले. (Tajya Batmya)

Latur News
Baramati News : शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलत संपविले जीवन; व्हिडीओ करत सांगितले खरे कारण

यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी (Cotton) कापूस व सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड केली. मात्र शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळाला नाही. अनेक शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन भाव वाढीच्या अपेक्षेने घरात साठवून ठेवले होते. मात्र अपेक्षित वाढ न झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी मिळेल त्या दरात विक्री केली. तर काहींनी अजून देखील विक्री केलेली नाही. शिवाय कांदा निर्यात बंदी असल्याने (Onion) कांद्याला देखील चांगला दर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. याच विरोधात शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळाले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Latur News
Nandurbar Temperature : उष्णतेची लाट.. नंदुरबार जिल्ह्याचे तापमान पोहोचलं ४२ अंशावर

शेतमाल घेऊनच ठिय्या 

लातूरमध्ये शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांनी सोयाबीन, कांदा, कापूस हा शेतमाल घेऊन दारातच ठिय्या आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव द्यावा; अशी मागणी देखील यावेळी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com