शेती आता आधुनिक झाली असून त्यात यंत्रांचा उपयोग केला जात आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत यंत्रांचा उपयोग करून उत्पादन वाढवावे यासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे. आता कृषी क्षेत्राला ड्रोनची साथ मिळाली आहे. ड्रोनमुळे बळीराजाची मेहनत वाचण्यास मदत होते. (Latest News)
पिकांचे (Crop) नुकसान किती झाले हे आपण एका जागेवर बसून पाहू शकतो. तसेच या ड्रोनद्वारे शेत (Farm) आणि पिकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवता येते. तण आणि कीटकांनी प्रभावित क्षेत्र ड्रोन (Agri Drone)वापरून शोधले जाऊ शकतात. ड्रोनमध्ये कॅमेरे, कीटकनाशक फवारणी यंत्रे (Spray Machines ) आदी अनेक प्रकारची उपकरणेही बसवली जातात. एक ड्रोन दररोज २० एकर क्षेत्रात नॅनो खत, पाण्यात विरघळणारी खते (Fertilizers) आणि नॅनो डीएपी फवारू शकतो.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
शेतकऱ्यांनी (Farmer)ड्रोन खरेदी करून शेतीच्या कामात त्याचा वापर करावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांना प्रोत्साहित करत आहे. याच्या वापरामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन उत्पन्न चांगले वाढू शकेल. मात्र ड्रोनची किंमत जास्त असल्याने शेतकरी ड्रोन खरेदी करू शकत नाहीत. ही बाब लक्षात घेत सरकार (Government) ड्रोन खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी ड्रोनच्या खरेदीवर बंपर सबसिडी (subsidy) देत आहे.
मोदी सरकार कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाला चालना देत असून याअंतर्गत ड्रोनच्या खरेदीवर ७५ टक्क्यांपर्यंत सबसिडी देण्यात येत आहे. शेतकऱ्यांव्यतिरिक्त, कृषी प्रशिक्षण संस्था आणि कृषी विद्यापीठे, कृषी उत्पादक संस्था, कृषी पदवीधर तरुण, अनुसूचित जाती/अनुसूचित जाती आणि महिला शेतकरी याचा लाभ घेऊ शकतात.
ड्रोनवर किती सबसिडी देणार सरकार?
शेतकऱ्यांना ड्रोनवर ४० टक्के ते १०० टक्के अनुदान मिळत आहे. कृषी प्रशिक्षण संस्था आणि कृषी विद्यापीठांना ड्रोन खरेदीवर १०० टक्के किंवा १० लाख रुपयांपर्यंतचे अनुदान देण्यात येत आहे. कृषी उत्पादक संस्थांना ड्रोन खरेदीवर ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान मिळेल. कृषी पदवीधर युवक, SC/ST प्रवर्गातील आणि महिला शेतकऱ्यांना ५० टक्के किंवा ५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळेल. इतर शेतकऱ्यांना ४० टक्के किंवा ४ लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.