Agriculture Irrigation Scheme: वैयक्तिक शेततळ्यासाठी अर्ज केलाय; सोडत निघताच करा 'ही' गोष्टी, नाहीतर होईल नुकसान

shettale yojana : वैयक्तिक शेततळ्यांसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेत ५० टक्के वाढ करण्यात आलीय. दुष्काळी परिस्थितीशी सामना करणाऱ्या बळीराजाची या योजनेला सर्वाधिक पसंती आहे. ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा घ्यायचा आहे, त्या शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावावर किमान ०.६ हेक्टर क्षेत्र जमीन असावी लागते.
shettale yojana
shettale yojana Saam Tv
Published On

Agriculture Irrigation Scheme shettale yojana :

पावसाच्या अनिश्चिततेमुळे पिकांना पाणी मिळत नसल्यानं शेतकऱ्यांच उत्पन्न कमी होते. राज्यातील कोरडवाहू शेती पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. कोरडवाहू शेती करतांना नेहमी पाणी टंचाईला समोरे जावे लागते. पिकांना पुरेसे पाणी उपलब्ध नसल्यानं शेतीच्या उत्पादनावर परिणाम होतो. यामुळे शेतीसाठी पाणलोट आणि जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविण्यासाठी सरकारकडून शेततळ्यांची योजना राबवण्यात येत आहे. (Latest News)

सिंचन वाढवण्यासाठी शेततळे कारण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान दिलं जात आहे. वैयक्तिक शेततळ्यांसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेत ५० टक्के वाढ करण्यात आलीय. दुष्काळी परिस्थितीशी सामना करणाऱ्या बळीराजाची या योजनेला सर्वाधिक पसंती आहे. ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा घ्यायचा आहे, त्या शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावावर किमान ०.६ हेक्टर क्षेत्र जमीन असावी लागते. जमीन शेततळे खोदण्यास योग्य असणे आवश्यक आहे. शेततळे, सामूहिक शेततळे किंवा इतर शासकीय योजनेतून अनुदानाचा लाभ घेतलेले नसावे.

काय घ्याल काळजी

शेततळे तयार करताना काही गोष्टींची खबरदारी घेणं आवश्यक आहे. शेततळ्यासाठी जागा निवडताना काही तांत्रिक निकष लावले जातात. ज्यानुसार जमिनीत पाणी पाझरण्याचे प्रमाण कमी आहे. काळी जमीन ज्यात चिकण मातीचे प्रमाण जास्त आहे, अशा जमिनी शेततळ्यास योग्य असल्याने निवड करण्यात यावी. पाणलोट क्षेत्रात, टंचाईग्रस्त गावातील लाभ क्षेत्रात घेण्यात यावी.

shettale yojana
Vishwakarma Yojana: गावकारागिरांना उभारी देणारी विश्वकर्मा योजना, मिळेल 3 लाखांचं कर्ज, असा करा अर्ज

कागदपत्रे

  • शेत जमिनीचा सात-बारा आणि ८-अ उतारा,

  • आधारकार्ड झेरॉक्स

  • बँक पासबुक झेरॉक्स

  • हमीपत्र आणि जातीचा दाखला आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.

लाभार्थी निवड अशी होते

ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी सीएससी केंद्रावर जाऊन http://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज करतेवेळी महाडीबीटी प्रणालीवर with inlet-outlet/without inlet-outlet यापैकी एका बाबीची निवड करावी. http://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळ CSC केंद्रावरुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज करतेवेळी महाडीबीटी प्रणालीवर with inlet-outlet/without inlet-outlet यापैकी एका बाबीची निवड करावी. महाडीबीटी ऑनलाईन पोर्टलवर प्राप्त अर्जातून संगणकीय प्रणालीद्वारे सोडतीने लाभार्थ्यांची निवड होईल.

प्लास्टीक अस्तरीकरण करण्यासाठी http://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर शेतकऱ्यांनी स्वतंत्र ऑनलाईन अर्ज करावा. यासाठी शेतकऱ्यांना ५० टक्के किंवा ७५ टक्के रक्कम अनुदान म्हणून उपलब्ध होते. यासाठी आधार क्रमांक प्रमाणीकरण आवश्यक आहे.

हे ठेवा लक्षात

कृषी विभागाचे कृषी सहाय्यकांनी निश्चित केलेल्या ठिकाणी शेततळे घेणे बंधनकारक राहील. शेततळ्याचे काम सुरू करण्याचे आदेश किंवा पूर्वसंमती पत्र मिळाल्या नंतर काम सुरू करावे लागेल. हे पत्र मिळाल्यानंतर शेततळ्याचे काम तीन महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक राहील. या योजनेची अधिक माहिती हवी असेल तर कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा.

तर लाभ होतात रद्द

‘महाडीबीटी’तून कृषी संदर्भातील योजनांसाठी अर्ज केल्यानंतर दरमहा लॉटरी काढून लाभार्थी निवडले जातात. लाभार्थ्याची निवड झाल्यानंतर संबंधित व्यक्तीने सातबारा, आठ-अ, बॅंक खात्याचे झेरॉक्स आणि आधारकार्ड अपलोड करावे. मुदतीत कागदपत्रे अपलोड न केल्यास त्या लाभार्थ्यांची निवड रद्द केली जाते.

shettale yojana
Birsa Munda Jayanti: बिरसा मुंडा यांच्या नावाने शेतकऱ्यांसाठी सुरू आहे योजना; काय आहे 'ही' स्कीम, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com