Cyber Crime : शेतकऱ्याला ऑनलाईन गंडा; लिंक पाठवून सव्वादहा लाख केले लंपास

Jalgaon News : रावेर तालुक्यातील केऱ्हाळा येथील ४५ वर्षीय शेतकऱ्याला १० ऑक्टोम्बरला व्हॉट्‌सॲपवर एका बँकेच्या नावाने एपीके फाइल पाठविण्यात आली
Cyber Crime
Cyber CrimeCyber Crime
Published On

जळगाव : ऑनलाईन फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. अशातच रावेर तालुक्यातील केऱ्हाळा येथील शेतकऱ्याच्या बँक खात्यातून १० लाख २४ हजाराची रक्कम लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. यात लिंक पाठवून त्या मध्यामातून शेतकऱ्याची फसवणूक केली आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

रावेर (Raver) तालुक्यातील केऱ्हाळा येथील ४५ वर्षीय शेतकऱ्याला १० ऑक्टोम्बरला व्हॉट्‌सॲपवर एका बँकेच्या नावाने एपीके फाइल पाठविण्यात आली. शेतकऱ्याने या ॲपच्या लिंकला क्लिक करत ती ओपन केली. या नंतर समोरच्याने त्यांच्या (Cyber Crime) मोबाईलचा ताबा घेऊन त्यांच्या बँक खात्यातून परस्पर १० लाख २४ हजार रुपये अन्य खात्यात ऑनलाइन वळवून घेतले. बँकेच्या खात्यातून रक्कम गेल्याचे शेतकऱ्याचे लक्षात आले. 

Cyber Crime
Selu Bajar Samiti : मालमत्ता कराचे थकविले ७५ लाख; थकबाकीपोटी सेलू कृउबाला लावले सील

या शेतकऱ्याने बँकेत तपस केला असता ऑनलाईन रक्कम वर्ग झाल्याचे समजले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्याने १४ ऑक्टोम्बरला जळगाव (Cyber Police) सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक नीलेश गायकवाड तपास करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com