Rain News: अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका, शिरूरमध्ये पावसामुळे केळीची बाग भुईसपाट

Shirur News: राज्यभरात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागत आहे.
अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका, शिरूरमध्ये पावसामुळे केळीची बाग भुईसपाट
Shirur NewsSaam Tv

Shirur Rain News:

राज्यभरात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागत आहे. यातच शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे आवकाळी पाऊसाने तीन एकर केळी बाग भुईसपाट होऊन शेतकऱ्यांचे १३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा, इनामगाव, तांदळी गणेगाव दुमाला बाभुळसर बुद्रुक, पिंपळसूटी, शिरसगाव काटा, या भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊसाचा जोर वाढत असल्याने फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून तातडीने पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका, शिरूरमध्ये पावसामुळे केळीची बाग भुईसपाट
Maharashtra Weather Update: पुढच्या ४८ तासांत या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पडणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा इशारा

पेढांबेत केळीच्या बागेचं नुकसान

रत्नागिरी येथील पेंढाबे गावात केळी बागेचं नुकसान झालय. संतोष शिंदे या शेतकरी याची ही केळीची बाग आहे. पाच एकरात त्यांनी २५ लाखाच्या केळीची लागवड केली असून महिन्याभरात केळी चिपळूण बाजारपेठमध्ये विक्रीला जाणार होती. त्यातच अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यानं केळीबाग जमीन दोस्त झाली. त्यात त्यांचे ८ लाखाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतलाय.

उत्तर पुणे जिल्ह्यात आवकाळी पाऊसाला सुरुवात

उत्तर पुणे जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वारा पाऊसाला सुरुवात झालीय. यामध्ये उन्हाळी बाजरी सह जनावरांची खाद्य पिकांचे नुकसान होण्याची भिती व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे आवकाळी पावसामुळे दुष्काळी परिस्थितीचे संकट दूर होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका, शिरूरमध्ये पावसामुळे केळीची बाग भुईसपाट
Special Story: गॅस भरायला पंपावर गेले आणि एका क्षणात सगळं संपलं! घाटकोपर दुर्घटनेनं नालासोपाऱ्याचं कुटुंब पोरकं केलं

रेल्वे बोगद्यात पाणी साठल्याने रेल्वे मार्ग झाला बंद

नंदुरबार शहरात झालेल्या रात्री अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या मोठं नुकसान झालं आहे. त्यासोबतच रेल्वे विभागाकडून तयार करण्यात आलेल्या बोगद्यात देखील पाणी साचल्याने शहरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पाणी साचले असल्याने वाहनासाठी रस्ता बंद झाला. रेल्वे विभागाकडून तयार करण्यात आलेल्या या बोगद्यात पाणी जाण्यासाठी जागा नसल्याने पाणी साचून राहत असतं. त्यामुळे आता हे पाणी किती दिवस साचून राहणार आणि रेल्वे प्रशासन याची दखल घेऊन कधी पाणी काढणार, हा प्रश्नाचा शहरातील नागरिकांसमोर उपस्थित झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com