साक्री (धुळे) : अक्कलपाडा धरणाच्या प्रकल्पांतर्गत पुनर्वसनात वडिलोपार्जित जमीन गेल्यानंतर (Dhule) भूमिहिन झालेल्या इच्छापूर (ता. साक्री) येथील शेतकऱ्याने (Farmer) आत्महत्या केली. हि घटना रविवारी समोर आली आहे. (Live Marathi News)
इच्छापूर (ता. साक्री) येथील राजेंद्र बुगा मारनर (वय ३२) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. राजेंद्र मारनर यांनी रविवारी (ता. २०) विषप्राशन करत जीवनयात्रा संपवली. त्यांच्यामागे पत्नी तसेच मुले आहेत. त्यांचे नातलग योगेश थोरात यांच्या माहितीवरून साक्री (Sakri) पोलिसांत मृत्यूची नोंद झाली. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर इच्छापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
दुसऱ्याची शेती करून उदरनिर्वाह
मारनर यांच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार भूमिहीन झालेले राजेंद्र मारनर दुसऱ्यांची शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. कुटुंब चालवण्यासाठी तसेच शेतीच्या कामांसाठी त्यांनी खासगी सावकारांकडून कर्ज घेतले होते. मात्र याच कर्जाच्या जाचातून त्यांनी रविवारी सायंकाळी विषप्राशन करत जीवनयात्रा संपविली. दरम्यान, या घटनेबाबत गावात हळहळ व्यक्त होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.