Nagpur Plane Emergency Landing : प्रवाशाला विमानातच रक्ताच्या उलट्या, इमर्जन्सी लँडिंगनंतरही व्यक्तीचा मृत्यू

Nagpur News : देवानंद तिवारी (६२ वर्ष) असं या प्रवाशाचं नाव आहे.
Indigo Filght News
Indigo Filght NewsSaam Tv
Published On

Nagpur News :

मुंबई-रांची इंडिगो विमानाचे नागपूर विमानतळावर रात्री इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे. विमानातील एका प्रवाशाची प्रकृती अचानक बिघडल्याने विमान नागपूर विमानतळावर उतरवले होते.

प्रवाशी रक्ताच्या उलट्या करत असल्याने तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. मात्र रुग्णालयात रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. देवानंद तिवारी (६२ वर्ष) असं या प्रवाशाचं नाव आहे.

Indigo Filght News
Vasai Accident News: महादेवाचे दर्शन घेऊन घरी निघाले; ओढणी बुलेटच्या चाकात अडकली अन् ..., पती समोर पत्नीने सोडले प्राण

प्रवाशाला किडनीचा आणि क्षयरोगाचा त्रास होता. त्यामुळे देवानंद यांना विमानात रक्ताच्या उलट्या झाल्या, असे नागपुरातील केआयएमएस हॉस्पिटलचे ब्रँडिंग आणि कम्युनिकेशन्सचे डीजीएम एजाज शमी यांनी सांगितले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पुढील प्रक्रियेसाठी त्यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नेण्यात आला असल्याची माहितीही शमी यांनी दिली. (Maharasthra News)

Indigo Filght News
Women dies due to snake bite : नागपंचमीसाठी माहेरी आलेल्या नवविवाहितेचा सर्पदंशाने मृत्यू, धाराशिवमधील हृदयद्रावक घटना

इंडिगो एअरलाईनने आपल्या निवेदनात म्हटलं की, मुंबईहून रांचीला जाणारे इंडिगो फ्लाइट 6E 5093 विमान वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे नागपूरला वळवण्यात आले. एका प्रवाशाची प्रकृती बिघडल्याने प्रवाशाला नागपूर येथे उतरवण्यात आले आणि पुढील वैद्यकीय मदतीसाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्दैवाने प्रवाशाची जीव वाचला नाही. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com