Chandrapur; ड्रॅगन फ्रुट शेतीचा प्रयोग यशस्वी...

शेतकरी नवे प्रयोग करतात. त्यांचे नाव आणि फायदाही झालेला दिसून आले
Chandrapur; ड्रॅगन फ्रुट शेतीचा प्रयोग यशस्वी...
Chandrapur; ड्रॅगन फ्रुट शेतीचा प्रयोग यशस्वी... संजय तुमराम

चंद्रपूर : जिल्ह्यात कृषी क्षेत्रात फार नवे बदल झालेले अभावानेच दिसून आले. जे काही झाले, ते मर्यादित स्वरूपाचे. मोठा फायदा असून शेतकरी पारंपरिक पिकांनाच प्राधान्य देतात. पण जे शेतकरी नवे प्रयोग करतात. त्यांचे नाव आणि फायदाही झालेला दिसून आले आहे. याच मालिकेत आता राजुरा येथील शेतकरी कवडू बोढे यांचा समावेश झाला आहे. त्यांनी पारंपरिक शेतीसोबतच ड्रॅगन फ्रुटची शेती करून सर्वांना चकित केले आहे.

हे देखील पहा-

कवडू बोढे हे वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडमध्ये नोकरीत होते. त्यांना २ एकर शेती आहे. २०१७ मध्ये निवृत्त झाल्यावर त्यांनी काहीतरी वेगळं करायचं ठरवलं. जवळच्या २ एकरांपैकी १ एकरात ड्रॅगन फ्रुटची शेती करण्याचा निर्धार केला होता. या फळात औषधीय गुणधर्म असल्याने त्याला बाजारात चांगली मागणी आहे. पण चंद्रपूरसारख्या उष्ण भागात हे फळ येईल का, हा प्रश्न होता.

Chandrapur; ड्रॅगन फ्रुट शेतीचा प्रयोग यशस्वी...
चिंताजनक! जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाखांच्या वर...

त्याकरिता कृषी विभागाचे मार्गदर्शन आणि या फळाच्या लागवडीचा अभ्यास त्यांनी केला. या कामात त्यांचा ग्रामसेवक मुलगा रवी याने देखील चांगल्या प्रमाणात मदत केली आहे. आणि २०१८ मध्ये याची लागवड केली. पहिले २ वर्षे जेमतेम पीक आल्यानंतर आता तिसऱ्या वर्षी चांगले उत्पादन हाती येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिमेंट पोल, रिंग आणि ठिंबक सिंचन आणि सेंद्रिय मिश्र खत यासाठी त्यांना प्रारंभी साडे ३ लाख रुपयांचा खर्च आला.

मात्र, खर्चाच्या तुलनेत मिळणारा नफा शाश्वत असल्याने खर्च निघून नफा मिळू लागला. या फळाला बाजारात २०० ते २५० रुपये किलोचा भाव असून, चंद्रपूर जिल्ह्यातच त्याची मागणी मोठी आहे. यामुळे बाजारपेठेचा मार्गही मोकळा झाला. ड्रॅगन फ्रुटची शेती हा जिल्ह्यासाठी नवा आणि पहिलाच प्रयोग आहे. तो यशस्वी झाल्याने इतरांसाठी प्रेरणादायीसुद्धा ठरला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com