Toxic Movie  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Toxic: यशच्या 'टॉक्सिक'ला बकवास म्हणणं प्रसिद्ध यूट्यूबरला पडलं महागात; थेट मिळाली कायदेशीर नोटीस

Toxic Movie : यशच्या ‘टॉक्सिक’ चित्रपटाच्या ऑनलाइन रिव्ह्यूवरून कायदेशीर वाद निर्माण झाला आहे. युट्यूबर सूरज कुमारला निर्मात्यांकडून नोटीस मिळाली असून, कोर्टानेही अंतरिम आदेश दिला आहे.

Shruti Vilas Kadam

Toxic: यशच्या बहुप्रतीक्षित ‘टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर आता ऑनलाइन रिव्ह्यू आणि कायदेशीर नोटिसीचा मुद्दा चर्चेत आला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच निर्मात्यांनी चुकीची किंवा बदनामीकारक माहिती ऑनलाइन पसरवली जाऊ नये, यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. बंगळुरूच्या न्यायालयाने याप्रकरणी ‘एकतर्फी अंतरिम मनाई आदेश’ जारी केला होता. आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एका युट्यूबरने निर्मात्यांच्या टीमकडून मिळालेल्या कायदेशीर नोटिसीचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला आहे.

युट्यूबर सूरज कुमार याने ‘X’वर ही माहिती शेअर केली. त्याने बंगळुरूच्या ‘अप्लेक्स सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड’कडून आलेल्या ईमेलचा स्क्रीनशॉट पोस्ट केला. या ईमेलमध्ये ही नोटीस ‘केव्हीएन मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स एलएलपी’ या चित्रपटाच्या निर्माते आणि कॉपीराइट मालकांच्या वतीने पाठवण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

रिव्ह्यू आणि ऑनलाइन मजकुरावर आक्षेप

नोटीसमध्ये सूरजने डिजिटल आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर ‘टॉक्सिक’बद्दलचे मत शेअर केल्याचा मजकूर शेअर केल्याचा उल्लेख आहे. या नोटिसीत अशा काही यूआरएलची यादीही देण्यात आली आहे, जिथे चित्रपटाबाबत निगेटिव्ह रिव्ह्यू देण्यात आले आहेत. यामध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आदल्या दिवशी सूरजने पोस्ट केलेल्या व्हिडिओ रिव्ह्यूचाही समावेश आहे.

यामध्ये इंटरनेट सेवा पुरवठादार, सर्च इंजिन, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, डोमेन रजिस्ट्रार आणि होस्टिंग कंपन्यांना नोटिसा पाठवणे, संबंधित रिव्ह्यूला हटवण्याची मागणी करणे, सर्च रिझल्टमधून लिंक डी-इंडेक्स करण्याची विनंती करणे आणि आवश्यक असल्यास रिव्ह्यू ब्लॉक करण्याची कारवाई करणे यांचा समावेश आहे. हे अधिकार १३ जुलै ते २६ सप्टेंबरपर्यंत देण्यात आल्याचे नोटिसीत नमूद आहे.

कोर्टाने दिला होता अंतरिम आदेश

पीटीआयच्या वृत्तानुसार, बंगळुरूच्या अतिरिक्त शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयाने २२ ऑगस्ट रोजी ‘टॉक्सिक’बाबत चुकीचा किंवा बदनामीकारक मजकूर प्रकाशित आणि प्रसारित करण्यास मनाई करणारा अंतरिम आदेश दिला होता. हा आदेश कायमस्वरूपी नसून पुढील सुनावणीपर्यंत, म्हणजे २८ सप्टेंबरपर्यंत लागू राहणार आहे. तसेच निर्मात्यांनी न्यायालयाने घालून दिलेल्या अटींचे पालन न केल्यास आदेश रद्द केला जाऊ शकतो, असा इशाराही न्यायालयाने दिला आहे.

पहिल्याच दिवशी १०१ कोटींची कमाई

दरम्यान, गीतू मोहनदास दिग्दर्शित ‘टॉक्सिक’ बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात करत आहे. यशची प्रमुख भूमिका असलेल्या या कन्नड ॲक्शन-ड्रामा चित्रपटाने भारतात पहिल्या दिवशी इंग्रजी वगळता इतर भाषांमध्ये मिळून १०१ कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केल्याचे वृत्त आहे. मोठ्या बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपट हिंदी, तेलगू, तमिळ, मल्याळम आणि इतर भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

7 Days Stop Watching Reels: 7 दिवस रील्स न पाहिल्यास शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या

Shweta Tiwari: श्वेता तिवारीचा अचानक यू-टर्न? आधी मनसेवर केले गंभीर आरोप, आता राज ठाकरेंचे मानले आभार

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट! 'या' महिलांना मिळणार नाही हप्ता; तुमचं यात नाव नाही ना?

Maharashtra News Live Update: एमपीएससी पेपर फुटी प्रकरणात मुंबई पोलिसांकडनं तपासाला गती

एका दिवसात ATM मधून किती पैसे काढू शकतो? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT