Manasvi Choudhary
आजकालच्या धकाधकीच्या आणि सोशल मीडियाच्या युगात इन्स्टाग्राम, फेसबुक किंवा युट्यूबवरील 'रील्स' बघण्याची अनेकांना सवय आहे.
.
काही लोकांना तर रिल्स बघितल्याशिवाय जेवण करण्याची आणि झोपण्याची इच्छा होत नाही. जेव्हा ते रिल्स बघतात तेव्हाच ते जेवण करतात आणि शांत झोपतात.
मात्र सतत रिल्स पाहल्याने शरीरात आणि मानसिक आरोग्यामध्ये अनेक बदल होतात ते बदल नेमके कोणते ते या वेबस्टोरीतून जाणून घेऊया
मात्र तुम्हाला माहितीये का? सतत रिल्स बघण्याची ही सवय शरीरावर परिणाम करते. वारंवार रिल्स पाहण्याची सवय तीव्र होते. प्रत्येक नवीन रिल्समुळे मजेदार नवीन पाहण्याची सवय होते ज्यामुळे मेंदूची रिवॉर्ड सिस्टीम सक्रिय होते.
तुम्ही जर आठवडाभर म्हणजेच ७ दिवस एकही रिल्स बघितली नाही तर मानसिक आरोग्यावर, एकाग्रतेवर आणि दैनंदिन दिनचर्यावर परिणाम होतो. सतत स्क्रोलिंग करणे थांबवल्याने मेंदूला सक्रिय होण्याच्या चक्रातून बाहेर पडण्यास मदत होते.
अनेकदा सतत फोन तपासण्याची अनेकांना सवय असते मात्र तुमची रिल्स पाहण्याची सवय सुटली असेल तर तुम्हाला थोडा वेळा कंटाळा किंवा चिंता वाटू शकते.
रात्री उशिरा पर्यंत रिल्स पाहण्याची सवय मोडते यामुळे झोप सुधारते. झोपण्यापूर्वी स्क्रिन टाईम कमी केल्याने शांत झोप लागते.
फोन पासून दूर राहिल्याने रिल्स पाहण्याची सवय मोडते आणि स्क्रोलिंगऐवजी व्यायाम, वाचन किंवा कुटुंब मित्रासोबत वेळ घालवणे शक्य होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.