Amaal Mallik Break: संगीतकार अमाल मलिक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘बिग बॉस १९’मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला अमाल गेल्या काही काळापासून विविध कारणांमुळे चर्चेत आहे. आता त्याच्या एका सोशल मीडिया पोस्टने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अमालने संगीतापासून काही काळ ब्रेक घेण्याची घोषणा केली आहे.
अमाल मलिकने २७ ऑगस्ट रोजी त्याच्या अधिकृत ‘X’ अकाउंटवर एक सविस्तर पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना या निर्णयाची माहिती दिली. या पोस्टमध्ये त्याने आपण ठीक असल्याचे सांगत, सध्या स्वतःच्या मनःशांती आणि आरोग्याला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.
अमालने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, 'मी अगदी ठीक आहे आणि यावेळी मी माझ्यासाठी जे सर्वोत्तम आहे. जे माझ्या हृदयासाठी आणि आरोग्यासाठी आवश्यक आहे तेच करेन. मन, शरीर आणि आत्मा या सर्वांना पूर्णपणे सावरण्यासाठी मला एका विश्रांतीची गरज आहे. मला पुढे जायचे आहे, पुन्हा भरारी घ्यायची आहे आणि लवकरच भरपूर संगीतासह तुमच्यासारख्या प्रिय अमालियन्सकडे परत यायचे आहे. पुढच्या वर्षापर्यंत कोणत्याही चित्रपटासाठी संगीत देणार नाही; मात्र, जुन्या आणि अद्याप प्रदर्शित न झालेल्या चित्रपटांमधील गाणी कदाचित लवकरच रिलीज होऊ शकतात. अर्थात, ते चित्रपट प्रदर्शित झाले तरच. हे चित्रपट चांगल्या उद्देशाने बनवलेले कमी बजेटचे चित्रपट असल्याने त्यात अनेक अडथळे येतात.
अमालने पुढे लिहिले, माझी विनंती आहे की, कृपया मला याबद्दल पुन्हा पुन्हा विचारून त्रास देऊ नका. काहीही माहिती मिळाल्यास मी नक्कीच अपडेट देईन. संगीतापासून चित्रपटसृष्टीपर्यंतचा प्रवास मला खूप दूर घेऊन गेला. आता मी पुन्हा संगीताकडे वळत आहे. तूर्तास मी आपली रजा घेतो; मी नक्कीच परत येईन."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.