जेवणासोबत तोंडी लावायला झटपट टोमॅटो चटणी बनवा. हा पदार्थ खूप झटपट बनवता येईल.
टोमॅटो चटणी बनवण्यासाठी टोमॅटो, हळद, हिंग, लाल तिखट, तेल, मोहरी, जिरे , मीठ आणि उडीद डाळ इत्यादी साहित्य लागते.
टोमॅटो चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम टोमॅटो स्वच्छ धुवून चांगले शिजवून घ्या. त्यानंतर टोमॅटोची साल काढून टोमॅटो मॅश करा.
त्यानंतर पॅनमध्ये तूप गरम करून त्यात टोमॅटो मऊ होईपर्यंत आणि पाणी आटेपर्यंत टोमॅटो शिजवा.
दुसऱ्या पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे आणि उडीद डाळ घालून फोडणी करा. त्यात तुम्ही हिंग, हळद, लसूण आणि लाल तिखट घाला.
त्यानंतर टोमॅटोच्या मिश्रणात फोडणी मिक्स करा. तुम्ही यात चिंचेचा रस देखील टाकू शकता.
शेवटी यात चवीनुसार मीठ टाका. जेणेकरून टोमॅटो चटणीची चव वाढेल. तुम्ही चटणी बनवताना टोमॅटोच्या बिया देखील काढू शकता.
गरमागरम चपाती, भातासोबत तुम्ही टोमॅटो चटणीचा आस्वाद घ्या.