Shreya Maskar
खास नाश्त्याला मुलांसाठी सांबारवडी बनवा. ही नागपूरची स्पेशल डिश आहे. तुम्ही गरमागरम चहासोबत याचा आस्वाद घेऊ शकता.
सांबारवडी बनवण्यासाठी बेसन, मैदा, ओवा, हळद, तेल, मीठ, तीळ, ओल खोबर, कोथिंबीर, लाल तिखट, हळद, काळा मसाला इत्यादी साहित्य लागते.
सांबारवडी बनवण्यासाठी मैदा, बेसन, मीठ, हळद, ओवा आणि तेल घालून कणिक चांगली मळून घ्या. कणिक मळल्यावर थोडा वेळा बाजूला ठेवून द्या.
सांबारवडीचे सारण बनवण्यासाठी पॅनमध्ये तीळ आणि ओलं खोबरं भाजून घ्या. ओलं खोबरं गोल्डन फ्राय करा.
पॅनमध्ये तेल टाकून लाल तिखट, हळद, काळा मसाला, खोबरं आणि तीळ घालून वाटण परतून मिक्सरला बारीक पेस्ट करा.
मिश्रणात बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ, तेल घालून एकत्र करून घ्या. यामुळे मिश्रण मऊ होईल.
मळलेल्या पिठाचे गोळे करून घ्या. छोटी पारी लाटून काळा मसाला, तीळाचे मिश्रण व्यवस्थित लावून घ्या.
शेवटी कोथिंबीर टाकून पारी बंद करा आणि गोल्डन फ्राय करा. सॉस किंवा चटणीसोबत सांबारवडीचा आस्वाद घ्या.