Shreya Maskar
रविवारी रात्रीच्या जेवणाला झटपट मसाला खिचडी बनवा. सिंपल रेसिपी आताच नोट करा. हा पदार्थ कमी वेळात टेस्टी बनतो.
मसाला खिचडी बनवण्यासाठी तांदूळ, मूग डाळ, भाज्या, बटाटा, तूप, जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग, गरम मसाला, लाल तिखट, मीठ आणि पाणी इत्यादी साहित्य लागते.
मसाला खिचडी बनवण्यासाठी तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घ्या. तुम्ही मसाला खिचडीमध्ये तळलेले काजू देखील टाकू शकता.
प्रेशर कुकरमध्ये तूप गरम करून फोडणी द्या. त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि हिंग घाला.
यात तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या कापून ५-८ मिनिटे शिजवून घ्या. यात गाजर, मटार, फरसबी, फ्लॉवर , बटाटा यांचा समावेश करा.
त्यानंतर गरम मसाला, लाल तिखट आणि मीठ घालून चांगले मिक्स करा. तुम्ही यात शेजवान चटणी देखील टाकू शकता.
शेवटी यात धुतलेले तांदूळ आणि डाळ मिक्स करूनपाणी टाकून ३-४ शिट्टी काढून भात शिजवून घ्या.
गरमागरम मसाला खिचडीचा रायता, लोणचे, पापड यांच्यासोबत आस्वाद घ्या. हा पदार्थ झटपट बनेल. तसेच मुलांना खायला देखील खूप आवडेल.