Sev puri chutney recipe SAAM TV
वेब स्टोरीज

Sev puri chutney recipe: शेवपुरीसाठी स्ट्रीट स्टाईल चटपटीत तिखट चटणी कशी तयार कराल?

घरच्या घरी शेवपुरीसाठी झणझणीत आणि चटपटीत चटणी बनवण्याची सोपी पद्धत जाणून घ्या. लाल मिरची, लसूण आणि लिंबाच्या रसाने तयार होणारी ही चटणी शेवपुरीची चव दुप्पट करते.

Surabhi Jayashree Jagdish
spicy chutney for chaat

शेवपुरी

शेवपुरीची खरी चव तिच्या तिखट चटणीमुळेच खुलते. ही चटणी चटपटीत, झणझणीत आणि थोडीशी आंबट असली की शेवपुरीचा आनंद दुप्पट होतो. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने ही चटणी तयार करता येते.

street food chutney

लागणारे साहित्य

या चटणीसाठी सुक्या लाल मिरच्या, लसूण पाकळ्या, मीठ आणि थोडंसं लिंबाचा रस लागतो. काहीजण चव वाढवण्यासाठी जिरं आणि थोडासा गूळही घालतात. हे सगळं साहित्य आधी तयार ठेवले तर चटणी पटकन बनवता येते.

Indian chaat recipes

मिरच्या भिजवण्याची पद्धत

सुक्या लाल मिरच्या साधारण 15 ते 20 मिनिटे कोमट पाण्यात भिजवून ठेवा. यामुळे मिरच्या मऊ होतात आणि त्यांची पेस्ट छान तयार होते. भिजवलेल्या मिरच्या वापरल्याने चटणीचा रंग आणि चव दोन्ही उत्तम येतात.

red garlic chutney

वाटण तयार करा

मिक्सरमध्ये भिजवलेल्या मिरच्या, लसूण आणि थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्या. वाटताना पाणी जास्त घालू नका, नाहीतर चटणी पातळ होईल. ही पेस्ट स्मूद आणि घट्ट असली पाहिजे.

homemade chutney

चव संतुलन

वाटलेल्या पेस्टमध्ये मीठ आणि लिंबाचा रस घालून नीट मिसळा. लिंबामुळे चटणीला हलकी आंबट चव येते जी शेवपुरीसाठी परफेक्ट असते. जर तुम्हाला थोडी गोडसर चव हवी असेल तर थोडासा गूळ घालू शकता.

chaat chutney recipe

मसाल्याचा ट्विस्ट

काहीजण या चटणीत भाजलेलं जिरेपूड घालतात, ज्यामुळे चव अधिक छान लागते. जिरेपूड घातल्याने चटणीला मसालेदार चव येते.

sev puri ingredients

शेवपुरीत वापरण्याची पद्धत

शेवपुरी बनवताना ही चटणी पुरीवर हलक्या हाताने पसरवा. त्यावर बटाट्याचा मसाला, गोड चटणी आणि शेव टाकल्यावर चव अप्रतिम लागते. योग्य प्रमाणात चटणी वापरल्याने शेवपुरी ना खूप तिखट होते ना फिकी लागते.

ginger and garlic in Maratha food

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वयंपाकात कोणते मसाले वापरले जायचे?

भाजपच्या मोर्चात गिरीश महाजनांवर भडकलेल्या महिलेविरोधात झेन सदावर्ते मैदानात; पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

महिला भक्तावर बलात्कार, पश्चिम महाराष्ट्रातून भोंदू भोसले महाराजाला बेड्या, वाचा नेमकं प्रकरण काय?

Maharashtra News Live Update: मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाव रील खंडाळा खातात ट्रॅफिक जाम..

Nashik Tourism : धुक्याची चादर, उंच डोंगर अन् निसर्ग शांतता; उन्हाळ्यात फिरा सह्याद्रीच्या कुशीत वसलेले 'हे' थंडगार ठिकाण

Car tyre replacement: किती किलोमीटरनंतर गाडीचे टायर बदलले पाहिजेत?

SCROLL FOR NEXT