हिवाळ्यात अनेकांना पचनाच्या समस्या जाणवतात. काही लोक कामानिमित्त घराबाहेर जास्त वेळ राहतात. त्यामुळे बाहेरचं खाणं त्यांच्या सोयीचं ठरतं. मात्र त्याने अपचाना समस्या दिवसेंदिवस वाढत जातात. त्यात हिवाळ्यात शरीराची हालचालही कमी होत असते. त्यामुळे खाल्लेले अन्न वेळेवर पचत नाही. यावर काही घरगुती उपाय तुम्ही करू शकता.
आज तक या चॅनेलशी बोलताना आचार्य बालकृष्ण यांनी अपचनाच्या समस्येवर काही घरगुती आयुर्वेदीक उपाय सांगितले आहेत. ज्याचा वापर तुम्ही थंडीच्या दिवसात करू शकता. यामध्ये गुळाचा वापर केला जातो, जो आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. कारण थंडीत शरीराला हवी असणारी ऊर्जा गुळात असते. इतकंच नाही तर याच्या सेवनाने पचनशक्ती मजबूत होते, अॅसिडीटी सारख्या समस्या नाहीशा होतात.
गुळा खाल्याने तुमच्या पोटातली जळजळ( डायजेस्टिव्ह फायर) लगेचच कमी होते. त्याने जेवण लवकर आणि व्यवस्थित पचतं. ज्या व्यक्तींना गॅस, पोट फुगी किंवा अपचनाच्या समस्या जाणवतात त्यांच्यासाठी गूळ खूप फायदेशीर असतो.
गुळ कधी खायचा?
आचार्य बालकृष्णांच्या मते, गुळ हा जेवणानंतर एक चमचाभर खाऊ शकतो. त्याने पोट साफ होतं आणि गॅस, अॅसिडीटीच्या समस्या नाहीशा होतात. याने तुमची डायजेस्टीव्ह सिस्टीम अॅक्टीव्ह होते.
गुळ हा पोटाच्या समस्येसाठी नैसर्गिक औषधाप्रमाणे काम करतो. कारण यात कोणत्याच प्रकारचं केमिकल नसतं. यामुळे गुळ हा खूप सुरक्षित मानला जातो. मात्र याचं प्रमाण कमी असलं पाहिजे. त्याने फक्त पोटालाच नाही तर संपूर्ण शरीराला फायदा होतो.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.