Raja Shivaji  saam tv
मनोरंजन बातम्या

Raja Shivaji: 'राजा शिवाजी'ची तुफान क्रेझ; बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ घालणार, अॅडव्हान्स बुकिंगसाठी धडाकेबाज सुरुवात

Raja Shivaji: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित रितेश देशमुख दिग्दर्शित राजा शिवाजी या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. या चित्रपटात मराठीसह बॉलिवूडचे अनेक दमदार कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Shruti Vilas Kadam

Raja Shivaji: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लाडका अभिनेता रितेश देशमुख लवकरच राजा शिवाजी या ऐतिहासिक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात मराठीसह बॉलिवूडचे अनेक दमदार कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटात महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास भव्य रुपात मांडणार आहे. यामुळेच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. आता प्रेक्षकांना अधिक वाट न पाहायला लावता या चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग सुरु झाले आहे.

रितेश देशमुखचे प्रत्येक चाहते राजा शिवाजीच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहे. दरम्यान, व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी आपल्या 'X' हँडलवरून अधिकृतपणे जाहीर केले आहे की, रितेश देशमुखच्या राजा शिवाजीसाठी अॅडव्हान्स बुकिंग आता सुरू झाले आहे.

'राजा शिवाजी' या चित्रपटाच्या मराठी व्हर्जनचे अॅडव्हान्स बुकिंग आजपासून म्हणजे २७ एप्रिलपासून सुरू झाले आहे. चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयी सध्या असलेल्या प्रचंड उत्साहा पाहता, रितेश देशमुखची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट अॅडव्हान्स बुकिंगमधून भरघोस कमाई करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हा चित्रपट येत्या महाराष्ट्र दिनी १ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये रितेश देशमुख शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर त्याच्यासोबत जिनिलिया देशमुख, अभिषेक बच्चन, संजय दत्त, विद्या बालन, भाग्यश्री, महेश मांजरेकर, जितेंद्र जोशी आदि कलाकार महत्वाच्या भूमिकेत आहेत. त्याचसोबत सलमान खानचा या चित्रपटात कॅमिओ असू शकतो अशा चर्चा देखील रंगल्या आहेत. अॅडव्हान्स बुकिंग तर सुरु झालं आहे आता हा चित्रपटा किती कमाई करणार आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार का याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Belly Fat: पोटावरील घेर वाढतोय? एक सवय ठरतेय नुकसानदायक, स्लिम होण्यासाठी आताच करा बदल

Mumbai heatwave: उष्णतेने मुंबईकर पडले आजारी; पोटाच्या आजारांचे रूग्ण ५० टक्क्यांनी वाढले

Maharashtra News Live Update: धुळे जिल्ह्यामध्ये 45.1° उचांकी तापमानाची नोंद

एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! माजी मंत्र्याने शेकडो कार्यकर्त्यांसह हाती घेतला धनुष्यबाण, राष्ट्रवादीला खिंडार

Shreya Bugde Photos: 'चला हवा येऊ द्या' फेम श्रेया बुगडेचं कॉटन हिरव्या साडीत फोटोशूट

SCROLL FOR NEXT