रोज जेवताना तोंडी लावायला काय बनवायचा हा प्रश्न घराघरात असतो. तुम्ही घरी वांग्याच्या चकत्यांचे भजी बनवू शकतात.
कांदीभजी, बटाटा भजी , मूग भजी तर तुम्ही खाल्ले असतील. परंतु वांग्याचे भजी कधी ट्राय केलेत का?
वांग्याचे भजी हे टेस्टी आणि पौष्टिक दोन्ही असतात. तसेच ज्यांना वांग आवडत नाही तेही आवडीने खातील.
लांब वांगे, बेसन पीठ, तांदळाचे पीठ, हळद, तिखट, जिरे, मीठ, तेल
सर्वात आधी मोठ्या आकाराचे वांगे धुवून घ्या. या वांग्याचे पातळ-गोलाकार काप करा.
हे वांग काळं पडू नये म्हणून मिठाच्या पाण्यात भिजत ठेवा.
यानंतर एका भांड्यात बेसन, तांदळाचे पीठ, हळद, तिखट, मीठ एकत्र करा. यानंतर यात पाणी टाका.
भजीच्या पीठासारखं घट्ट मिश्रण तयार करुन घ्या. मिश्रण जास्त पातळ नसावे
यानंतर वांग्याचे काप एकेक करुन त्यात बुडवून घ्या.
एका बाजूला कढईत तेल गरम करा. त्यात हे वांग्याचे काप सोडून तळून घ्या.