Sakshi Sunil Jadhav
मांजर ही अनेकांच्या जिव्हाळ्याची किंवा घरातल्या गृहीणींची सोबती असते. ती वाटेल त्यांच्या घरात राहते आणि तिला कोणी नकारही देत नाही.
घराच्या बाहेर अचानक मांजरींचं भांडण, किंचाळणं किंवा जोरजोरात आवाज ऐकू येणं अनेकांना घाबरवून टाकतं. काही लोक याला शुभ-अशुभ संकेत मानतात. पण यामागे नेमकं कारण जाणून घेऊयात.
मांजरी स्वतःचा परिसर सुरक्षित ठेवतात. दुसरी मांजर त्यांच्या हद्दीत आली तर त्या भांडण करतात.
मांजरीना त्यांच्या प्रजननाच्या काळात म्हणजेच रात्री जास्त राग येतो. यामध्ये मांजर आणि बोक्यामध्ये जोरदार भांडणं होतात.
मांजरी किंचाळणं, गुरगुरणं किंवा फुंकर मारणं या पद्धतीने त्यांच्या भावना व्यक्त करतात. भांडण म्हणजे कायम मारामारीच असते असं नाही.
मांजरी भांडणं म्हणजे काही वाईट घडणार असा समज म्हणजे अंधश्रद्धा आहे. याला कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.
रस्त्यावरील मांजरी अन्नासाठी भांडू शकतात. ही त्यांच्यामधली वादाची कारणं असतात.
नवीन मांजर परिसरात दिसल्या की त्यांच्यामध्ये जोरजोरात वाद होतात. यामध्ये एकमेंकींना पकडून नखं सुद्धा मारली जातात.
अनेकांना वाटतं की मांजरी ज्या ठिकाणी भांडतात. त्या ठिकाणी वाद होण्याची शक्यता जास्त असते. पण याचा मांजरींशी संबंध नाही.