Moringa Chutney saam tv
वेब स्टोरीज

Moringa Chutney: वजन कमी करण्यासाठी मोरिंग्याच्या पानाची चटणी कशी बनवाल?

मोरिंगा म्हणजेच शेवग्याच्या पानांची चटणी ही पौष्टिक सुपरफूड रेसिपी आहे. जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्सने भरलेली ही चटणी वजन कमी करण्यास मदत करते आणि डोसा, इडली, पोळी किंवा भाकरीसोबत अतिशय स्वादिष्ट लागते.

Surabhi Jayashree Jagdish
Healthy Chutney Recipe

मोरिंगाची चटणी

मोरिंगा म्हणजेच शेवग्याच्या पानांची चटणी ही चवदार आणि पौष्टिक सुपरफूड म्हणून ओळखली जाते. या चटणीत अनेक महत्त्वाचे जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरासाठी फायदेशीर ठरतात. वजन कमी करण्यासाठी ही खूप उपयुक्त असते.

Weight Loss Foods

ताजी पानं

चटणी बनवण्यासाठी ताजी मोरिंगा पानं देठांपासून वेगळी करून स्वच्छ पाण्याने नीट धुवून घ्यावीत.

ताजी पानं वापरल्यास चटणीची चव आणि पौष्टिकता दोन्ही वाढतात.

Moringa Benefits

डाळी भाजा

यानंतर चणा डाळ आणि उडीद डाळ मंद आचेवर हलक्या सोनेरी रंगाची होईपर्यंत भाजून घ्या. त्यात जिरे, हिंग, लसूण आणि हिरव्या किंवा सुक्या मिरच्या घालून पुन्हा काही मिनिटं परता. मसाल्यांचा छान सुगंध येऊ लागला की पुढील प्रक्रिया सुरू करा.

Nutritious Indian Chutney

कडूपणा कमी करा

भाजलेल्या मसाल्यांच्या मिश्रणात मोरिंगाची पानं घालून सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र मिसळा. मंद आचेवर पानं थोडी मऊ आणि शिजेपर्यंत परतत राहा. यामुळे पानांमधील नैसर्गिक कडूपणा कमी होऊन चटणी अधिक स्वादिष्ट बनते.

Homemade Chutney

वेगळी चव

जर तुम्हाला चटणीत थोडी आंबट आणि वेगळी चव हवी असेल तर त्यात चिंच, मीठ आणि किसलेलं ताजं खोबरं घालू शकता. हे साहित्य चटणीची चव अधिक समृद्ध आणि संतुलित बनवते. सर्व घटक एकजीव होईपर्यंत काही वेळ परतून घ्या.

Antioxidant Rich Foods

मिश्रण थंड करा

तयार झालेले मिश्रण एका ताटात किंवा भांड्यात काढून पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवा. मिश्रण थंड झाल्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यात घालून वाटण्यासाठी तयार करा. गरजेनुसार थोडं पाणी घालून त्याला योग्य पोत द्या.

Healthy Indian Food

चटणी तयार करा

मिक्सरमध्ये मिश्रण बारीक किंवा जाडसर तुमच्या आवडीनुसार वाटून चटणी तयार करा. शेवटी कढीपत्ता आणि सुक्या लाल मिरचीची फोडणी दिल्यास तिची चव आणखी छान लागते. ही पौष्टिक मोरिंगाची चटणी डोसा, इडली, पोळी किंवा भाकरीसोबत अतिशय स्वादिष्ट लागते.

High Blood Sugar

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

Maharashtra News Live Update: यवतमाळात वंचितच्या 14 आंदोलकांवर गुन्हे दाखल

Monsoon Saree Collection : स्टायलिश अन् कम्फर्टेबल! पावसाळ्यातही नेसा सुंदर साड्या, 'हे' लेटेस्ट कलेक्शन एकदा नक्की पाहा

Veen Doghantali Hi Tutena : घट्ट मिठी, गालावर किस; समर-स्वानंदीच्या नात्यात रोमँटिक केमिस्ट्री सुरू, पाहा VIDEO

Earthquake : नाशिक पुन्हा भूकंपाने हादरले, मध्यरात्री २ तालुक्यात जमीन थरथरली अन्...; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Fatty Liver : लिव्हर खराब झाल्यास काय खावे? डॉक्टरांनी दिली सर्वात महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT