Monsoon Saree Collection : स्टायलिश अन् कम्फर्टेबल! पावसाळ्यातही नेसा सुंदर साड्या, 'हे' लेटेस्ट कलेक्शन एकदा नक्की पाहा

Shreya Maskar

प्रिंटेड साडी

पावासाळ्यात प्रिंटेड साड्या खूपच सुंदर दिसतात. या वजनाने हलक्या असतात. तुम्ही सुंदर, आकर्षक फुलांच्या नक्षी असलेल्या साडीची निवड करा.

Printed saree | pinterest

पेस्टल रंगाची साडी

पावसाळ्यात लग्न समारंभासाठी पेस्टल रंगाच्या साड्या सुंदर दिसतात. या साड्यांवर हाफ-स्लीव्ह किंवा पफ-स्टाईलचे ब्लाउज खूप छान दिसतात.

Pastel color saree | pinterest

फुलांच्या प्रिंटची साडी

फुलांच्या प्रिंटच्या साड्यांचे आकर्षण कधीच कमी होत नाही. कॅज्युअल लूकसाठी तुम्ही ही स्टाईल निवडू शकता. याव्यतिरिक्त, जर तुम्ही एखाद्या पार्टीला जात असाल तर ही साडी चमकदार किंवा सिक्विन ब्लाउजसोबत स्टाइल करा.

Floral print saree | pinterest

सिक्विन साडी

सिक्विन साडी नाईट पार्टी आणि लग्नसमारंभांसाठी बेस्ट ऑप्शन आहे. मोत्याचे दागिन्यांनी लूक पूर्ण करा. ही स्टाइल करताना कमीत कमी मेकअप करा.

Sequin saree | pinterest

नारंगी साडी

नारंगी साड्या फॅशन ट्रेंडमध्ये आघाडीवर आहेत. वजनाने हलकी असल्यामुळे, ही साडी नेसायला खूप सोपी आहे. तुम्ही ही साडी मेहंदी, हळद या कार्यक्रमासाठी नेसू शकता.

Orange saree | pinterest

रफल साडी

रफल साडी लग्न समारंभ, पार्टी, ऑफिस मीटिंग खूपच अनोखी आहे. तुम्हाला वेस्टर्न लूक करायचा असेल तर ही साडी नक्की निवडा.

Ruffle saree | pinterest

साड्यांचे रंग

पावसाळ्यात नेव्ही ब्लू, बॉटल ग्रीन, मरून किंवा वाईन यांसारख्या गडद आणि उठावदार रंगाची साडी निवडा.

Colors of sarees | pinterest

साड्यांचे ब्लाउज

साड्यांवर सुती , लिनेन, शिफॉनसारख्या हलक्या फॅब्रिकचे, बोटनेक, स्लीव्हलेस, कोपरपर्यंत बाह्यांचे ब्लाउज परिधान करा. सुती, कलमकारी, अज्रख प्रिंट, आणि पेस्टल रंगांचे ब्लाउज स्टायलिश आणि 'कूल' लूक देतात.

Saree blouse | pinterest

NEXT : पावसाळ्यात साडीसाठी शिवा लेटेस्ट फॅशनचे ब्लाउज, 'या' ५ डिझाइन्स तुम्हाला नक्कीच आवडतील

Saree Blouse Designs | SAAM TV
येथे क्लिक करा...