Saree Blouse Designs : पावसाळ्यात साडीसाठी शिवा लेटेस्ट फॅशनचे ब्लाउज, 'या' ५ डिझाइन्स तुम्हाला नक्कीच आवडतील

Shreya Maskar

पावसाळा

पावसाळा असो वा उन्हाळा महिलांना साडी नेसायला खूपच आवडते. पावसाळ्यात साडीवर तुम्ही सुंदर ब्लाउज स्टाइल करा आणि आपले सौंदर्य वाढवा.

rainy season | pinterest

ऑफ-शोल्डर ब्लाउज

ग्लॅमरस लूकसाठी तुम्ही ऑफ-शोल्डर ब्लाउज घालू शकता. पावसाळ्यात ऑफिस पार्टी असो की घरी कोणता समारंभ यात तुम्ही खूपच सुंदर दिसाल.

Off-shoulder blouse | google

बॅकलेस ब्लाउज

तुम्हाला ओपन डिझाइनचे ब्लाउज आवडत असतील, तर तुम्ही बॅकलेस ब्लाउज शिवून घेऊ शकता. तो पॅडेड असल्याची नेहमी खात्री करा, जेणेकरून तुम्हाला तो बॅकलेस घालताना कोणतीही अडचण येणार नाही.

Backless blouse | pinterest

स्लीव्हलेस ब्लाउज

मुलींना स्लीव्हलेस ब्लाउज खूप आवडतात. तुम्ही ते घरापासून ऑफिसपर्यंत घालू शकता. ते छानही दिसतात. तसेच यात हवा खेळती राहते.

A sleeveless blouse | pinterest

Tube blouseट्यूब ब्लाउज

आजकालच्या मुलींसाठी ट्यूब ब्लाउज खूप ट्रेंडी आहेत. डीप-नेक ट्यूब ब्लाउज तुम्हाला युनिक आणि ग्लॅमरस दिसण्यास मदत करेल. यावर ओपन पदर असलेली साडी नेसल्यास तुम्ही अधिक सुंदर दिसाल.

Tube blouse | google

नूडल स्ट्रैप ब्लाउज

पार्टीसाठी साडी नेसत असाल तर त्यासोबत नूडल स्ट्रैप ब्लाउज परिधान करा. यात आजकाल अनेक व्हरायटी आल्या आहेत. तुमच्या आवडीचे रंग निवडा.

Noodle Strap Blouse | pinterest

क्रॉप टॉप स्टाइल ब्लाउज

तुम्ही साडीवर क्रॉप टॉप स्टाइल करू शकता. क्रॉप टॉप स्टाईलचा ब्लाउज खूपच सुंदर दिसतो. तुम्ही हा ब्लाउज पार्टी किंवा ऑफिसमध्ये घालू शकता. यावर साडीचा पदर मोकळा सोडा.

Crop top style blouse | pinterest

ब्लाउजचा रंग

पावसाळ्यात नेव्ही ब्लू, बॉटल ग्रीन, मरून किंवा वाईन यांसारख्या गडद आणि उठावदार रंगांची निवड करा.

Color of blouse | pinterest

NEXT : घरंदाज अन् शालीन लूक हवाय? नऊवारी साडीवर शिवा 'या' पॅटर्नचं ब्लाउज

Nauvari Saree Blouse Designs | pinterest
येथे क्लिक करा...