Shreya Maskar
खणाचा ब्लाउज पारंपारिक आणि मॉडर्न लूकसाठी अतिशय लोकप्रिय आहे. हे ब्लाउज विशेषतः मरून, हिरव्या आणि निळ्या रंगांत, जरीच्या काठासह येतात. पैठणी आणि नऊवारी साडीवर शोभून दिसतात.
पेशवाई ब्लाउज ही क्लासिक डिझाइन बहुतेकदा रेशमाच्या कापडापासून बनवलेले असते, ज्याला लहान बाह्या आणि खोल गोल किंवा चौकोनी गळा असतो.
पारंपरिक पेशवाई ब्लाउज हिरव्या किंवा लाल साड्यांसोबत परिधान केला तर तुमच्या सौंदर्यात नक्कीच भर पडेल.
जड जरदोजी, भरतकाम किंवा आरशाचे वर्क असलेले ब्लाउज आलिशान पैठणी आणि नऊवारी साडीवर शोभून दिसतो. मागच्या गळ्यावर आकर्षक मोर किंवा वेलीचे नक्षीकाम असते.
तुम्ही एका शाही लग्नसोहळ्यात नऊवारी नेसून जात असाल तर बंद गळ्याचे ब्लाउज हा उत्तम पर्याय आहे. एक शालीन आणि घरंदाज लूक येईल.
हाय-नेक ब्रोकेड ब्लाउजएक राजेशाही आणि आकर्षक लूक देतो. हा ब्लाउज पूर्ण बाह्यांचे किंवा पाऊण बाह्यांचे असतात. हे ब्लाउज बनारसी ब्रोकेडसारख्या मौल्यवान कापडापासून बनवलेले असतात.
नऊवारी साडीला वेस्टर्न टच द्यायचा असेल तर प्रिंसेस कट ब्लाउजची निवड करा. ही डिझाइन शरीराला सुडौलपणे बसते, ज्यामुळे शरीरयष्टी सुधारते.
नऊवारी साडीवर पफ स्लीव्हज ब्लाउज पारंपरिक आणि रेट्रो लूकसाठी उत्तम आहेत. कोपरपर्यंत पफ स्लीव्हज, पैठणी किंवा सिल्क साड्यांवर अत्यंत सुंदर दिसतात. एक आकर्षक महाराष्ट्रीयन लूक देतात.