Shreya Maskar
टॉप ५ डीप नेक ब्लाउज डिझाइन्समध्ये ट्रेंडी प्लंजिंग व्ही-नेक, स्वीटहार्ट नेकलाइन, वाइड यू-बॅक ब्लाउज, मॉडर्न स्कैलप्ड कडा असलेला ब्लाउज आणि दोरीसह बोल्ड बॅकलेस स्टाईल्स यांचा समावेश आहे.
ब्लाउजच्या या ट्रेंडी डिझाइन्स अनेकदा सिल्क, वेलवेट किंवा एम्बेलिश्ड फॅब्रिकमध्ये दिसतात. लग्न समारंभ आणि पार्ट्यांसाठी साड्या आणि लेहेंगांचा लूक अधिक आकर्षक दिसतो.
डीप व्ही-नेक ब्लाउज हा तुम्हाला बोल्ड लूक देतो. वेस्टर्न पार्टीसाठी तयार होत असाल तर ही ब्लाउज स्टाइल तुम्ही नक्की ट्राय करा.
स्वीटहार्ट नेकलाइन ब्लाउज त्याच्या नावानुसार तुमच्या साडीला एक स्वीट आणि क्यूट लूक देतो. हा ब्लाउज साडीच्या सिल्क मटेरियलसोबत उत्तम दिसते.
उन्हाळ्यात एक क्लासिक आणि आरामदायक लूक हवा असेल तर वाइड यू-बॅक ब्लाउज बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही ब्लाउजला डोरी देखील बांधू शकता.
स्कॅलप्ड डीप नेक ब्लाउज सध्या फॅशनमध्ये खूप लोकप्रिय आहेत. या डिझाइनमध्ये गळ्याच्या काठावर अर्धचंद्राकृती कटवर्क असते, जे साडी किंवा लेहेंगा लुकला अधिक मोहक आणि आधुनिक बनवते.
बॅकलेस ब्लाउज हा कधीही आउट ऑफ फॅशन होत नाही. याती व्हारायटी येतच राहते. यामुळे तुम्हाला एक बोल्ड लूक मिळेल. तुमच्या आवडत्या डिझाइननुसार बॅकलेस ब्लाउज निवडा.
फॅब्रिकमध्ये डीप नेकसाठी वेलवेट, सिल्क, जॉर्जेट, साटन, सिल्क, मखमली , चंदेरी, जकार्ड आणि पॉलिस्टर उत्तम दिसते.