Cotton Saree Designs : उन्हाळ्यात 'अशी' करा कॉटनची साडी स्टाइल, 'ही' खास डिझाइन तुमच्याकडे असायलाच हवी

Shreya Maskar

उन्हाळा

साडी हा महिलांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. मात्र उन्हाळ्यात साडी नेसताना खूप त्रास होतो. कारण प्रचंड गरम होते आणि त्यात साडीमध्ये गर्मी वाढते. त्यामुळे बहुतेक महिला उन्हाळ्यात साडी नेसणे टाळतात.

Summer | pinterest

कॉटन फ्लोरल प्रिंट साड्या

महिलांनो टेन्शन सोडा आणि उन्हाळ्यातही तुम्ही साडी स्टाइल करू शकता. यासाठी कॉटन फ्लोरल प्रिंट साड्या बेस्ट आहेत. कारण कॉटन घाम शोषून घेते आणि फ्लोरल प्रिंट उन्हाळ्यात फ्रेश वाइब्स देतात.

Cotton Floral Print Sarees | pinterest

कॉम्बिनेशन

फ्लोरल प्रिंट साड्या हलक्या, हवेशीर असतात. कॉटन साडीत फ्लोरल प्रिंट म्हणजे सुंदर कॉम्बिनेशन होय. तुम्ही साडीवर साजेल असा ब्लाउजची निवड करा.

The Combination | pinterest

रंगसंगती

फ्लोरल प्रिंटमध्ये कॉटन व्यतिरिक्त शिफॉन, जॉर्जेट यासाड्या देखील सुंदर दिसतात. तुम्ही उन्हाळ्यात पेस्टल रंगाची निवड करा. जसे की, लॅव्हेंडर, ब्लश पिंक आणि मिंट ग्रीन, निळा.

Color Palette | pinterest

साडीचे ब्लाउज

कॉटन साडीवर बोट नेक, कोपरापर्यंतच्या बाह्या आणि आकर्षक कॉलर यांसारखे खास डिझाइनचे ब्लाउज सुंदर दिसतात. लिनन ब्लाउजची देखील तुम्ही निवड करू शकता. समारंभ आणि पार्टीसाठी ही सुंदर दिसेल.

Saree Blouses | pinterest

साडीचा पदर

फुलांची नक्षी असलेली साडी स्टाइल करताना साडीचा पदर खूर महत्त्वाचा आहे. तुम्ही पदर सुंदर मोकळा सोडू शकता. या फुलांच्या नक्षीदार साड्यांवर उठावदार लूक मिळवण्यासाठी, एकरंगी , हाय-नेक किंवा पफ-स्लीव्ह्ज असलेल्या ब्लाऊजची निवड करावी.

Saree Pallu | pinterest

साडी कशी स्टाइल करावी?

कॉटन फ्लोरल प्रिंट साडी स्टाइल करताना लहान स्टड्स किंवा ऑक्सिडाइज्ड चांदीसारखे मिनिमलिस्ट दागिने, फ्लॅट सँडल्स किंवा जुत्ती घाला आणि मेकअप हलका ठेवा. मॉर्डन लूकसाठी बेल्ट वापरा.

How ​​to Style the Saree | pinterest

सुंदर लूक येईल

कॉटन फ्लोरल प्रिंट साड्या तुम्ही उन्हाळ्यात लग्न समारंभ, पार्टी , ऑफिस , पूजा यासर्व ठिकाणी स्टाइल करू शकता.

Stunning Look | pinterest

NEXT : डेली वेअर साडी दिसेल डिझाइनर, एकदा ट्राय करा 'हे' ५ फॅन्सी ब्लाउज पॅटर्न्स

Saree Blouse Designs | pinterest
येथे क्लिक करा...