After OLC Movie Saam tv
मनोरंजन बातम्या

After OLC: मराठीला साऊथच्या अ‍ॅक्शनचा तडका; 'आफ्टर ओ.एल.सी'मध्ये मिळणार दमदार ॲक्शन आणि थराराची पर्वणी

After OLC Marathi Movie: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेला बहुप्रतिक्षित ॲक्शनपट ‘आफ्टर ओ.एल.सी’ अखेर आपल्या प्रदर्शनाच्या तारखेसह सज्ज आहे. या चित्रपटात अनेक दमदार कलाकार झळकणार आहे.

Shruti Vilas Kadam

After OLC Marathi Movie: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेला बहुप्रतिक्षित ॲक्शनपट ‘आफ्टर ओ.एल.सी’ अखेर आपल्या प्रदर्शनाच्या तारखेसह सज्ज झाला आहे. अनेक दिवसांपासून प्रेक्षक ज्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते, तो हा दमदार ॲक्शन-थरारपट ६ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटामुळे मराठी सिनेसृष्टीत पुन्हा एकदा वेगळ्या धाटणीच्या ॲक्शन सिनेमाची लाट येणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

‘आफ्टर ओ.एल.सी’चा ट्रेलर प्रदर्शित होताच त्यातील तगडी ॲक्शन, रहस्यमय कथानक आणि थरारक प्रसंगांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. प्रत्येक फ्रेममध्ये दिसणारी वेगळी ऊर्जा, वेगवान घडामोडी आणि उत्कंठावर्धक मांडणीमुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. हा सिनेमा केवळ ॲक्शनपुरताच मर्यादित न राहता, रहस्य आणि भावनिक पैलूंनाही स्पर्श करतो, असा अंदाज ट्रेलरवरून लावला जात आहे.

चित्रपटात कवीश शेट्टी, मेघा शेट्टी, शिवानी सुर्वे, विराट मडके, अश्विनी चवरे यांच्यासह अनेक मराठी कलाकारांची दमदार फळी पाहायला मिळणार आहे. प्रत्येक कलाकाराने आपल्या भूमिकेत प्राण ओतल्याने कथानक अधिक प्रभावी आणि वास्तवदर्शी झाल्याचे दिसून येते. विशेषतः ॲक्शन सीक्वेन्स आणि थरारक प्रसंगांमध्ये कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा ठरणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन कन्नड सिनेसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक सडागारा राघवेंद्र यांनी केले आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि वेगळ्या दृष्टीकोनाचा ठसा ‘आफ्टर ओ.एल.सी’मध्ये स्पष्टपणे जाणवतो. ‘दिपक राणे फिल्म्स’ आणि ‘इंडियन फिल्म फॅक्टरी’ यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. मराठी भाषेत प्रदर्शित होणारा हा सिनेमा असल्यामुळे मराठी प्रेक्षकांमध्ये त्याबद्दल विशेष कुतूहल आहे.

दमदार कथा, जबरदस्त ॲक्शन, रहस्य आणि थरार यांचा परिपूर्ण संगम असलेला ‘आफ्टर ओ.एल.सी’ ६ फेब्रुवारीपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. थराराची ही वेगळी सफर अनुभवण्यासाठी मराठी प्रेक्षकांनी सज्ज राहावे, असेच चित्रपटाचे एकूण स्वरूप पाहता म्हणावे लागेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nankhatai Recipe: तोंडात टाकताच विरघळेल नानकटाई, वाचा सोपी अन् तव्यावर बनणारी खुसखुशीत रेसिपी

Maharashtra Live News Update: ठाणे महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी सव्वा सव्वा वर्षाचा फॉर्म्युला ठरला

Ajit Pawar Death: दादा… कुठं हरवलात तुम्ही? तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय...; अजितदादांसाठी रोहित पवारांची भावुक पोस्ट

Kitchen Hacks : रोजच्या वापरातील कैची धारदार करण्याचे 'हे' सोपे घरगुती उपाय, जाणून घ्या

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना धक्का! या जिल्ह्यातील ६१ हजार महिलांचा लाभ बंद; तुमचं तर नाव नाही ना?

SCROLL FOR NEXT