पावसाच्या सरीत नादखुळा डान्स; तरुणाचा व्हिडिओ नेटिझन्सच्या पसंतीस उतरला

Dance Viral Video: एका मराठी पावसाळी गाण्यावर एका तरुणाने धमाल डान्स करत सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. त्याच्या उर्जेने भरलेल्या स्टेप्स पाहून नेटकरीही थक्क झाले आहेत. तुम्हीही एकदा व्हिडिओ पाहा.
Dance Viral Video
Youth performing energetic moves on Zhunzur Munzur Paus Varyan Netizens call it pure talentSaam Tv
Published On

Trending Dance Video: पावसाळा सुरू झाला की मराठी माणसाच्या मनात एक वेगळीच गाणी गुणगुणायला सुरुवात होते. त्यातही जर झुंजूर मुंजूर पाऊस वाऱ्यानं हे मराठी गाणं म्हणजे एक आगळंच रसायन असतं. हे गाणं ऐकताना आपण नकळतच पावसात चिंब भिजत नाचायला लागतो. सध्या सोशल मीडियावर अशाच एका तरुणाचा डान्स प्रचंड व्हायरल झाला आहे. 'झुंजूर मुंजूर' या पावसाळी गाण्यावर केलेला त्याचा नादखुळा डान्स पाहून नेटकरी अक्षरश: फिदा झाले आहेत.

व्हिडिओमध्ये दिसणारा हा तरुण रस्त्याच्या कडेला पावसात भिजत नाचताना दिसत आहे. त्याच्या अंगात जणू काही विजेचा करंट भरल्यासारखी एनर्जी आहे. प्रत्येक स्टेपमध्ये इतकी उत्स्फूर्ती आणि उत्साह आहे की तो डान्स(DANCE) पाहताना कोणाच्याही अंगावर रोमांच उमटावा. पारंपरिक मराठी गाण्यावर अशा तडफदार आणि सिनेमॅटिक स्टाईलमध्ये डान्स करणे म्हणजे खरंच कौतुकास्पद आहे.

या डान्समागे कोणतीही तयारी, कोरिओग्राफर किंवा प्रॅक्टिस नसल्याचं दिसतं. ती सहजता, ती नैसर्गिक शैली म्हणजेच त्याचं खरं टॅलेंट. पावसात भिजताना त्याने केलेला प्रत्येक स्टेप मन मोहवून टाकतो. हे पाहूनच अनेकांनी त्याला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. त्यातही तो इन्स्टाग्रामवरील mangesh_sutar_487 या अकाउंटवर हजारो लोकांनी पाहिला असून त्यावर अनेक लाईक्स आणि व्ह्यूज मिळालेले आहेत.

व्हिडिओ(VIDEO) इतका व्हायरल झाला की त्यावर बऱ्याच जणांनी प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत. एका यूजरने म्हटलं की,''एक नंबर तुझी कंबर'' ,दुसऱ्या यूजरने म्हटलं,''खुपच सुंदर डान्स केला भावा'' तर काहींनी ,''असाच डान्स करत राहा'' असे कौतुक केले आहे.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Dance Viral Video
हळदीत वहिनींचा डान्स पाहून सगळे घायाळ; ''चोली के पीछे'' गाण्यावर दिला जबरदस्त परफॉर्मन्स

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com