Worlds Best Husband: जगातला सर्वोत्तम नवरा सापडला! बायकोला वागवतो राणीसारखं; शॉपिंगसाठी लाखोंचा खर्च, परदेशी टूर अन् बरंच काही

Husband Gives 8 Lakh To Wife Shopping: जगातला सर्वोत्तम नवरा सापडला आहे. जो आपल्या बायकोला राणीसारखं वागवतो. तिच्या शॉपिंगसाठी तो लाखोंचा खर्च करतो.
Worlds Best Husband
Worlds Best HusbandYandex
Published On

Latest Viral News

आपला जोडीदार स्वप्नांतील राजकुमारासारखा असावा, अशी प्रत्येक मुलीची ईच्छा असते. नवऱ्याने तिच्या भावनांचा आदर करावा. तिचे सर्व हट्ट पुरवावेत, अशी प्रत्येक पत्नीची ईच्छा असते. परंतु असा नवरा मिळणं फक्त स्वप्नातच शक्य (Best Husband) असतं. पण जर हे स्वप्न खरं झालं तर? हो जगामध्ये एक अशी व्यक्ती आहे, जो त्याच्या पत्नीचे सर्व लाड पुरवतो. तिचे सर्व हट्ट पूर्ण करतो. (Latest Marathi News)

ही व्यक्ती अमेरिकेची आहे. आर्टुरो पेस्ताना नावाची व्यक्ती आपल्या पत्नीचे सर्व हट्ट पुरवतो. जगातील सर्वोत्तम पती म्हणून त्याच्याकडे बघितलं जात आहे. तो आपल्या पत्नीला खूश ठेवण्यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे, असं त्यानी सांगितलं (World's Best Husband) आहे. आता ही व्यक्ती आपल्या बायकोचे सर्व लाड का पुरवते, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आपण यामागचं कारण जाणून घेऊ या.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पतीनं दिलं राजकुमारीसारखं वागवण्याचं वचन

जेव्हा आर्टुरो 12 वर्षांचा होता, तेव्हा तो पहिल्या नजरेत प्रेमात अमीराच्या पडला. पण तेव्हा तो अमीराला आवडत नव्हता. अमिराला पटवायला आर्टुरोला सहा वर्षे लागली. अखेर अमिराने आर्टुरोसोबत डेटवर जाण्यास होकार ( Wife Shopping) दिला. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी मे 2023 मध्ये लग्न केलं होतं. त्यांना अवघ्या चार महिन्यांपूर्वी मुलगा झाला आहे. आर्टुरो अमिराला त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत राजकुमारीसारखं वागवेल, असं वचन दिलं आहे.

डेली स्टारच्या वृत्तानुसार, २४ वर्षीय आर्टुरो हा मियामीचा रहिवासी आणि तो एक व्यावसायिक आहे. पत्नी अमीरा इब्राहिमला तो राजकुमारीप्रमाणे वागवतो. तिला कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली (Husband Gives 8 Lakh Rupees To Wife) जाते. आर्टुरो आपल्या पत्नीला दर महिन्याला 10 हजार डॉलर्स (म्हणजे 8.25 लाख रुपयांहून अधिक) देतो. हे पैसे तिला शॉपिंग करण्यासाठी दिले जातात. इतकंच नाही तर तो पत्नीला मोकळेपणाने जगण्यासाठी चार दिवसांची सुट्टी देखील देतो.

Worlds Best Husband
Viral Video: नगरची 'सुपर डान्सर'; विद्यार्थिनीच्या लईच भारी डान्सला प्रेक्षकांची उत्स्फुर्त दाद, पाहा VIDEO

बायकोला शॉपिंगसाठी पैसे

या व्यक्तीचं मासिक उत्पन्न सुमारे $60,000 (अंदाजे 50 लाख रुपये) आहे. यातून तो त्याच्या पत्नीचे सर्व हट्ट सहजतेने पूर्ण करू शकतो. यामध्ये घरगुती खर्चाचा समावेश नाही. हा पैसा फक्त अमीरासाठी डिझायनर कपडे आणि आलिशान हँडबॅग खरेदी करण्यासाठी वापरला (Viral News) जातो. हे जोडपं न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया आणि बहामास सारख्या ठिकाणी फिरायला जातं. हा सर्व खर्च तिचा पती करतो.

Worlds Best Husband
Viral Video: चहाच्या दुकानात तरूणांची तुंबळ हाणामारी; तोडफोडीचा Video व्हायरल, भांडणाचं विचित्र कारण आलं समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com